fodder scam 
मुख्य बातम्या

चारा घोटाळ्यात लालूंना ५ वर्षांचा कारावास

लालू प्रसाद यादव यांना विशेष न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यातील ३ वर्षे आणि ९० दिवस त्यांनी शिक्षा भोगली आहे. एकूण शिक्षेपैकी निम्मीही शिक्षा भोगून झाली आहे.

टीम ॲग्रोवन

डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी (चारा घोटाळा ) (Fodder Scam) बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. के. शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली आहे.  याशिवाय लालू प्रसाद यादव यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात येत आहे.

हेही वाचा - दुधातील भेसळ रोखण्यासाठी दुसऱ्या श्वेत क्रांतीची गरज १५ फेब्रुवारी रोजी माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ७४ वर्षीय लालू प्रसाद यांना तुरुंग प्रशासनाने राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (रिम्स) उपचारासाठी पाठवले होते. लालू प्रसाद हे रिम्समधूनच सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले होते.  शिक्षा सुनावण्यापूर्वी सीबीआयने सर्व दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने किमान शिक्षेचा आग्रह धरला. रांची न्यायालय परिसरात बिहारमधूनही मोठ्या संख्येने आरजेडी नेते आणि कार्यकर्ते पोहोचले होते.

लालू प्रसाद यादव यांना विशेष न्यायालयाने ५ वर्षांच्या कारावासाची  (5 Year Jailed)शिक्षा सुनावली आहे. त्यातील ३ वर्षे आणि ९० दिवस त्यांनी शिक्षा भोगली आहे. एकूण शिक्षेपैकी निम्मीही शिक्षा भोगून झाली आहे. त्यामुळे आम्ही आता जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे लालू प्रसाद यांचे वकील अनंत अन्नात कुमार वीज यांनी सांगितले आहे.  

व्हिडीओ पाहा -  

१५ फेब्रुवारी रोजी रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरलेल्या ३६ जणांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ याशिवाय कट रचण्याशी संबंधित कलम १२० ब आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत न्यायालयाने दोषी ठरवले. काय आहे प्रकरण? चारा घोटाळ्याचे हे प्रकरण सुमारे २३ वर्षे जुने आहे. १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडमधील डोरंडा येथील कोशागारामधून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. या प्रकरणी सीबीआयने २९ जानेवारी रोजी विशेष न्यायालयात युक्तिवाद पूर्ण केला होता. यापूर्वी लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये १४ वर्षांची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे दुमका, देवघर आणि चाईबासा कोषागारातून पैसे काढण्याशी संबंधित होती. त्याच वेळी, आता लालू प्रसाद यांना डोरंडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Market Rate : ११ महिन्यांनंतरही 'कापूस उत्पादकता अभियाना'ला मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतिक्षा; केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा कागदावरच

Rabi Crop Insurance: सोलापूर जिल्ह्यातील केवळ ४३ हजार जणांनी भरला पीकविमा

Leopard Attack: डहाणूत बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

Chikoo Farmers Issue: पालघरमधील चिकूच्या उत्पन्नाला कात्री

Flood Relief: जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून मदत

SCROLL FOR NEXT