Startup Investment 
मुख्य बातम्या

चार वर्षांत  ॲग्रीटेक स्टार्टअपमध्ये भागभांडवलासह ६६०० कोटींची खासगी गुंतवणूक

गेल्या चार वर्षात (२०१७-२०) देशातील ॲग्रीटेक स्टार्टपमध्ये खासगी भागभांडवालासह ६६०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. तसेच यामध्ये दरवर्षी ५० टक्क्यांची वाढ होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

टीम ॲग्रोवन

गेल्या चार वर्षात (२०१७-२०) देशातील  ॲग्रीटेक स्टार्टपमध्ये (Agri-Tech Startup) खासगी भागभांडवालासह (Private Investment) ६६०० कोटींची गुंतवणूक झाली आहे. तसेच यामध्ये दरवर्षी ५० टक्क्यांची वाढ होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. याशिवाय ग्रामीण मायक्रो फायनान्स (Micro Finance) क्षेत्रातही गेल्या १८ महिन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ मधील १.२२ लाख कोटींवरून मार्च २०२१ मध्ये ही वाढ १.४६ लाख कोटींवर गेली असल्याची माहिती बिझनेस लाईनने दिली आहे.

हेही वाचा - जागतीक बाजारात गहू, मका, सूर्यफूल तेल महागले बेन अँड कंपनी आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीद्वारे या क्षेत्रात कार्यक्षमता सुधार आणि कर्ज वितरण वाढवणे शक्य होणार आहे.  समस्या निराकरण, शाश्वत व्यवस्था उभारणी, आणि सर्वसमावेशक विकासासाठी काम करणाऱ्या स्टार्टअप्सवर गुंतवणुकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचप्रमाणे वित्तीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाने गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गज याकडे आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याची संधी म्हणून पाहत आहेत. तसेच पीकांच्या आरोग्याचे निरिक्षण (Crop Health Monitoring) आणि उत्पन्न अंदाजासाठी नाविन्यपूर्ण उपायांमध्ये गुंतवणूक करत आहेत, असेही या अभ्यासात म्हटले आहे. भारतातील अन्न आणि शेती पारंपरिक शेतीपासून नव्या शेती मॉडेल्स, प्रगत कृषी तंत्रज्ञान, आणि नवीन अन्न उत्पादनांमध्ये  विकसित होईल, असे बेन अँड कंपनीच्या पारिजात जैन यांनी म्हटले आहे.

२०१९-२० मध्ये एकूण ग्रामीण GDP मध्ये अंदाजे ३७ टक्के योगदान देणारे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कृषी हे सर्वात मोठे उपक्षेत्र आहे, असे अभ्यासात म्हटले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान ३५ लाख कोटी रुपयांचे आहे. प्रथिने, स्निग्धांश, फळे, आणि भाजीपाला यांचा कृषी उत्पादन मूल्याच्या ६० टक्के वाटा आहे. देशातील एकूण शेत जमिनीपैकी गहू आणि तांदूळाची ४० पेरणी असून एकूण उत्पादन एक चतुर्थांश आहे.

शेतकरी आणि शेतकरी उत्पादन संस्थाची पुढची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञान हाताळण्यात सराईत झाल्या आहेत. कृषी मूल्य साखळीत निविष्ठा, कापणीपासून प्रक्रिया आणि वितरणापर्यंत नवीन व्यवसाय मॉडेल्स उदयास येत आहेत, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. पारंपारिक शेतीचे कृषी व्यवसायात रूपांतर होत असताना पतपुरवठ्याची  उपलब्धता जलद वाढू लागली आहे. ग्रामीण भारतात अजूनही रोख व्यवहारांची पद्धत असताना गेल्या वर्षात दुप्पट युपीआय व्हवहारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे सीआयआयच्या अभ्यासात म्हटले आहे.

दरम्यान, ग्रामीण अर्थव्यवस्थेत कर्ज मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत कृषी पतपुरवठा १० टक्क्यांनी वाढला आहे. २०१५ आर्थिक वर्षात ८ लाख कोटींवरून २०२० मध्ये १४ लाख कोटींवर गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना फोन करा; बच्चू कडूसह शेतकरी नेत्यांची शिष्टमंडळाकडे मागणी

Bacchu Kadu Live : न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले; आंदोलनावर मात्र ठाम

Farmer Compensation: भरपाईची रक्कम अन्य खात्यात वळविल्यास कारवाई

Kukadi Project: हिरडगावात कुकडी चारी दुरुस्तीला शेतकऱ्यांचा विरोध

Wildlife Conflict: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढला

SCROLL FOR NEXT