Ahilyanagar News: अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरकारी योजना आहेत. तरीही लाभ मिळत नसेल तर ही बाब गंभीर असून याबाबत लवकरच जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची बैठक घेणार आहोत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. आयुष्मान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा योजनांचा लाभ गरजूंना मिळाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले..अहिल्यानगर येथे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संदीप गाडे यांच्या इंपल्स हॉस्पिटलच्या नवीन वास्तूचे लोकार्पण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते..Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा.या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार सुरेश धस, महंत नामदेव शास्त्री महाराज, बबन बहिरवाल महाराज, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, माजी आमदार भीमराव धोंडे व साहेबराव दरेकर, नवनाथ गाडे, फुलाबाई गाडे, डॉ. ज्योती गाडे व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते..Health Scheme : वंचित, गोरगरिबांना आरोग्य योजनांची माहिती द्यावी.सर्वच भागात हृदयरोगांचे रुग्ण वाढत आहेतच. पण, कॅन्सरच्या रुग्णांतही वाढ होत असल्याची बाब दिसून येत आहे. आधुनिक उपचारांतून अशा आजारांवर मात करता येऊ शकते. .आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या असून सरकार गरीब रुग्णांना मदत करते. मात्र काही रुग्णालयांत याबाबत कुचराई केली जात असल्याच्या तक्रारी आहेत, असे स्पष्ट करत विखे पाटील यांनी बैठक घेण्याबाबत सुतोवाच केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.