Nashik News: शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा तसेच शेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक मोठे गोदाम उभारण्यात येईल, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले..पणन हंगाम शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत शासकीय गोदाम, कोपरगाव रोड, येवला येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते सहकार महर्षी गोविंदराव सोनवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मका खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. .Farmer Support: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ‘जलसंपदा’कडून दिलासा.या वेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, भोलाशेठ लोणारी, बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, भाजपचे नेते प्रमोद सस्कर, नाना लहरे, राजुसिंग परदेशी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, किसनकाका धनगे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर यांच्यासह पणन विभाग, अन्न, नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..Farmer Support: शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे.भुजबळ म्हणाले, ‘‘मक्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने खरेदी केंद्र वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यामुळे दुसरे खरेदी केंद्र येवल्यात सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून मका पूर्णपणे वाळवून केंद्रावर खरेदी केंद्रावर आणावा.’’या वेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मकरंद सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी मोठे गोदाम उभारण्यात येईलशेतीमालाचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक मोठे गोदाम उभारण्यात येईल. अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे. शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच जास्तीत जास्त मका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.