Wheat Export 
मुख्य बातम्या

भारत यावर्षी विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत 

यंदाच्या हंगामात भारत विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात करण्याच्या तयारीत आहे. जागतिक बाजारात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धान्य उत्पादक भारताला जागतिक बाजारातीस हिस्सेदारी वाढविण्याची संधी मिळणार आहे.

टीम ॲग्रोवन

यंदाच्या हंगामात भारत विक्रमी ७० लाख टन गहू निर्यात (Wheat Export) करण्याच्या तयारीत आहे. जागतिक बाजारात गव्हाच्या किमती (Internation Prices Of Wheat) वाढल्या आहेत. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धान्य उत्पादक भारताला जागतिक बाजारातील हिस्सेदारी वाढविण्याची संधी मिळणार आहे. रॉयटर्सने ही बातमी दिली आहे.

हेही वाचा - युध्दाचा सोयाबीन दरवाढीशी संबंध काय? यावर्षी भारतीय गव्हाच्या निर्यातीत (Export Of Indian Wheat) वाढ झाल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव सुधांशु पांडे (Sudhanshu Pandey) यांनी शनिवारी (ता.५) दिली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत भारतातून यापूर्वीच ६६ लाख टन गव्हाची निर्यात झाली असून अजून एक महिना बाकी असल्याचे पांडे म्हणाले.       यापूर्वी २०१२-१३ मध्ये भारताने विक्रमी ६५ लाख टन गव्हाची निर्यात केली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतींमध्ये तेजी आली आहे. यामुळे गहू  निर्यात व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. रशिया आणि युक्रेन (Russia Ukarain War) यांच्यात युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुरवठा खंडीत होण्याच्या भितीमुळे शिकागोमधील गव्हाच्या बेंचमार्क किमती या आठवड्यात ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. जागतिक बाजारात रशिया आणि युक्रेन यांचा गहू निर्यातीत ३० टक्क्यांचा वाटा आहे.

हेही वाचा - खरिपात खत टंचाई भासण्याची शक्यता गेल्यावर्षी तालिबानने ताब्यात घेतल्यापासून गरिबी आणि उपासमारीचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानला (Wheat Export To Afganistan) मदत म्हणून ५० हजार टन गहू पाठवण्यात येणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. भारतातून यापूर्वीच ४ हजार टन गहू पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठविण्यात आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Economy: आली लहर, केला कहर

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

SCROLL FOR NEXT