संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पावणेचार लाख जनावरांचे ‘लंम्पी’ नियंत्रणासाठी लसीकरण

टीम अॅग्रोवन

मुंबई : पशुधनातील लंम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोठी मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ७४४ जनावरांनी ही लस टोचण्यात आली आहे. त्यानंतरही पशुसंवर्धन विभागाकडे सुमारे साडेतीन लाख लस उपलब्ध आहे. गरजेनुसार आणखी लस खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ‘लंम्पी’ आजाराबाबत भीती न बाळगता खबरदारी म्हणून जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. 

याबाबत ‘अॅग्रोवन’ने पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, की लंम्पी आजाराने राज्यातील २१ जिल्ह्यांतील जनावरे बाधित झाली आहेत. १ लाख २५ हजार ७१७ जनावरे या आजाराने बाधित आहेत. आतापर्यंत या आजाराने यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक पशुधन दगावले आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. गोट पॉक्स लस यावर प्रभावी मानली जाते. आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ७४४ पशुधनाला ही लस देण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाकडे एकूण ७ लाख ४४ हजार ८०० लसी उपलब्ध होत्या, लसीकरणानंतर अजून विभागाकडे साडेतीन लाख लसी उपलब्ध आहेत. 

हेस्टर या कंपनीची ही लस असून ती खुल्या बाजारातून खरेदी करावी लागते. विभागाने केंद्र-राज्य सरकारच्या योजनेतून अस्काड कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध निधीतून वर्धा, नांदेड, लातूर, यवतमाळ, परभणी, भंडारा, गोंदिया प्रत्येकी एक लाख रुपये, बीड जिल्हा अडीच लाख रुपये, नागपूरला पाच लाख रुपयांचा निधी दिला आहेत. याशिवाय जिल्हा परिषदांनी सुद्धा त्यांच्याकडील सेस फंडमधून या लसची खरेदी केलेली आहे, असे अनुप कुमार  यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया  पशुधनातील लंम्पी आजाराबाबत भीती न बाळगता खबरदारी म्हणून लसीकरण करुन घ्यावे. पशुधनातील हा आजार बरा होण्यासारखा आहे. या आजाराने बाधित जनावरांच्या मृत्यूचे प्रमाणही अत्यंत अल्प म्हणजे नसल्यासारखेच आहे. - अनुपकुमार, प्रधान सचिव, पशुसंवर्धन विभाग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT