संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांत भूजल सर्वेक्षण करणार : जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे

पुणे : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ८२ गावांत पिण्याच्या पाण्याच्या उपायोजना करण्यासाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या गावांच्या भूजलाचे सर्वेक्षण करावे, सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये विंधन विहरी खोदण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेऊन नियोजन करावे, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

पुणे  : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ८२ गावांत पिण्याच्या पाण्याच्या उपायोजना करण्यासाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या गावांच्या भूजलाचे सर्वेक्षण करावे, सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असलेल्या गावांमध्ये विंधन विहरी खोदण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेऊन नियोजन करावे, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता.२२) जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला बालकल्याण सभापती पुजा पारगे, गटनेते शरद बुट्टे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.

‘कोरोना’मुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरूस्ती रखडली आहे. महिन्याभरात ही दुरूस्ती न झाल्यास ठेकेदार ही कामे टाळून अनामत रक्कम काढतील. यामुळे महिन्याभरात दुरूस्तीचे कामे व्हावी अशी मागणी शरद बुट्टे पाटील यांनी केली. दोन वर्षांमध्ये झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दुरूस्ती करण्याबाबत सुचना करण्यात आल्या. जी कामे अद्यापही सुरु झालेली नाहीत अशा ठेकेदारांची यादी तयार करावी आणि सभेमध्ये सादर करावीत अशा सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुण्याबाहेरून येणाऱ्यांची तपासणी व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात कोव्हीड केअर सेंटर सुरू करावे. घशातील स्रावाचे नमुने तालुका पातळीवरच घेण्याची सोय करावी, कोरानाबाधितांचे सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविकांना एक हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. आशा सेविकांना केवळ एका महिन्यांचेच मानधन मिळाले. यापुढील मानधन देण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी आशा बुचके यांनी केली. यासाठी एक वर्षाचा प्रवास भत्ता तसेच मतदार संघातील फिरती भत्ता रक्कम देण्यासही जिल्हा परिषद सदस्यांनी मान्यता दिली. आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर औषध खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

  ‘क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यावरच घरी पाठवा’ कोरोनाबाधित रूग्णांवर योग्य उपचार झाल्यानंतर आणि क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यावरच डिस्चार्ज मिळावा, अशा सूचना अध्यक्षा पानसरे यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या सर्व सुरक्षा रक्षक सफाई कर्मचाऱ्यांची आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात यावी. पुणे-मुंबईतून येणाऱ्यांचे योग्य पद्धतीने विलगीकरण व्हावे, अशा सुचनाही पानसरे यांनी दिल्या.   बैठकीतील निर्णय असे

  • पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे डोंगर-कडे कोसळण्याची शक्यता असलेल्या गावांचे सर्वेक्षण करणार.
  • पशुवैद्यकीय दवाखाना तळेगाव दाभाडे येथे एक्सरे मशिन खरदी करण्यास प्रशासकीय मान्यता
  • यशवंत शरद ग्रामविकास योजनेचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यास मंजूरी
  • जिल्हा परिषद शाळांना क्रीडा व इतर साहित्य देणार
  • यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या निधीत २५ हजारांची वाढ करणार
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: सिताफळाला मिळतोय उठाव; तुरीचा बाजार मंदीतच, फ्लाॅवरची आवक कमीच, लसणाचे भाव स्थिर तर मुगाचा भाव नरमला

    Gokul Dairy: दूध फरक वाटपातील गोंधळामुळे ‘गोकुळ’ प्रशासन धारेवर

    Farm Roads: तीन हजार पाणंद रस्त्यांच्या झाल्या नोंदी

    Maharashtra Monsoon Rain: तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

    Drip Irrigation Projects : सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT