विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 
मुख्य बातम्या

रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्या ः देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन

मुंबई : रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्यावे, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी महत्त्वाची साधनसामुग्री तत्काळ उपलब्ध करावी आणि तबलिगींसंदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करावी, अशा तीन मागण्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केल्या आहेत. 

राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. १६ राज्यांनी रेशनकार्ड नसतानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे. शिधापत्रिका नसल्यास आधार कार्ड प्रमाण मानावे, तेही नसल्यास यादी तयार करून प्रमाणित करावी, अशी मागणी श्री. फडणवीस यांनी केली आहे. मुंबईतील रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची कमतरता असल्याचे समोर येत आहेत. त्यांनाही ‘कोरोना’ चा संसर्ग होत असल्याने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता श्री. फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT