संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात ५८ लाख २८ हजार टन ऊस गाळप

टीम अॅग्रोवन

सातारा  ः जिल्ह्यात गाळप हंगामास वेग आला आहे. परिपक्व ऊस उपलब्ध होत असल्याने कारखान्यांच्या साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून, सरासरी ११.७६ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यातील ‘स्वराज’ आणि ‘शरयू’ या कारखान्यांना अपवाद वगळता सर्वच कारखान्यांचा उतारा ११ टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी गुरुवारअखेर ५८ लाख २८ हजार ९५८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून ६८ लाख ५५ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अजूनही ऊस शिल्लक असल्याने गाळप हंगाम लांबणार आहे.

जिल्ह्यात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असला, तरी हा हंगाम शिल्लक ऊस व उशिरा सुरू झालेल्या गाळपामुळे लांबणार आहे. सध्या हंगामास गती आली असून १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी ५८ लाख २८ हजार ९५८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले; तर ६८ लाख ५५ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. परिपक्व ऊस उपलब्ध होत असल्यामुळे साखर उताऱ्यात सुधारणा झाली आहे. ‘स्वराज’ आणि ‘शरयू’ या कारखान्यांना अपवाद वगळता सर्वच कारखान्यांना सरासरी ११ टक्क्यांवर साखर उतारा मिळत असून जिल्ह्यात सरासरी ११.७६ टक्के उतारा मिळत आहे.

एकूण गाळपात सात सहकारी कारखान्यांनी ३० लाख ७३ हजार ९५५ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून ३७ लाख ३० हजार ७७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे; तसेच सात खासगी कारखान्यांनी २७ लाख ५५ हजार दोन टन ऊस गाळप करीत ३१ लाख २४ हजार ९१० क्विंटल साखर उत्पादन घेतले. कारखान्यांत गाळपात सुरू असलेली स्पर्धा दरात दिसत नाही. सह्याद्री, अथणी-रयत या दोन कारखान्यांनी प्रतिटन २८०० रुपये दर दिला आहे. इतर कारखान्यांनी २५०० रुपये दरम्यान दर दिला आहे.

‘जरंडेश्वर’ची आघाडी कायम जिल्ह्यात गाळप, साखर उत्पादन, उताऱ्यात जरंडेश्वर कारखान्याची आघाडी कायम आहे. जरंडेश्वर कारखान्याने आठ लाख ४१ हजार ७५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून दहा लाख ६९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी १२.७० टक्के साखर उतारा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT