शेतीमाल निर्यातीबाबत प्रशिक्षणात बोलताना शिरीष जमधडे
शेतीमाल निर्यातीबाबत प्रशिक्षणात बोलताना शिरीष जमधडे 
मुख्य बातम्या

कृषी विभागाच्या योजना क्लस्टरबेस राबवणार : शिरीष जमधडे

टीम अॅग्रोवन

पुणे  ः जागतिक बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी शेतीमालाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.  द्राक्षे, डाळिंब, संत्रा, मोसंबी या पिकांमध्ये राज्य आघाडीवर आहे. या पिकांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजना आता क्लस्टरबेस राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात कोणत्याही एका पिकाचे एक क्लस्टर तयार करावे लागणार आहे, असे मत फलोत्पादन संचालक शिरीष जमधडे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय यांच्या वतीने ग्रेपनेट, अनारनेट, व्हेजनेट, मॅगोनेट, सिट्रसनेट, द्वारा निर्यातक्षम बागांची नोंदणी व तपासणीबाबत जिल्हास्तरीय क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच (ता.३१) पुण्यात आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री. जमधडे बोलत होते. राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, निर्यात विभागाचे तज्ज्ञ गोंविद हांडे, निर्यातदार संजय भानावत, सतीश वराडे आदी या वेळी उपस्थित होते.

यावेळी गोंविद हांडे म्हणाले, की परदेशातून शेतीमालाला मोठी मागणी आहे. त्यासाठी शेतीमाल रेसिड्यू फ्री असणे आवश्यक आहे. मागणीची पूर्तता करण्याकरिता मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटीनेट द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. युवा शेतकऱ्यांना कृषिमाल निर्यातीत मोठ्या संधी आहेत. राज्यात सुमारे १९ ठिकाणांहून कृषीषिमाल निर्यातीकरिता फायटोसॅनेटरी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वेळी डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी मार्गदर्शन केले.      

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT