संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवर

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी सद्य:स्थितीत राज्यातील ३९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडे २३ हजार १०२ कोटींची नवी थकबाकी वाढली आहे. त्यामध्ये कर्जमाफीपूर्वी नियमित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ३० जिल्हा बॅंकांनी मागील वर्षी ३१ हजार ५२७ कोटी ४३ लाखांचे शेती व बिगरशेतीसाठी कर्जवाटप केले. मात्र, अतिवृष्टी, पूर, अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बॅंकांच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे एकूण कर्जवाटपातील आठ हजार ४२५ कोटी ४० लाखांची कर्जवसुली झाली आहे. 

दरम्यान, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बीड, बुलडाणा व नागपूर या जिल्हा बॅंकांनी मागील वर्षात शेती व बिगरशेतीसाठी १४ हजार ७६ कोटींचे कर्जवाटप केले. मात्र, त्यातून फक्‍त ७८१ कोटी ७८ लाखांचीच वसुली झाली आहे. दुसरीकडे लातूर, भंडारा, सातारा, चंद्रपूर, ठाणे, गडचिरोली आणि जळगाव या जिल्हा बॅंकांची वसुली ४१ टक्‍क्‍यांहून अधिक झाल्याचे राज्य बॅंकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कर्जवाटपासाठी स्वतंत्र अधिकारी कर्जमाफीनंतरही शेती व बिगरशेती कर्जाची थकबाकी तथा येणेबाकी वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुतांश बॅंकांनी आता नियमांवर तंतोतंत बोट ठेवत शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. कर्जाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात जाऊन पिकांची पाहणी करणे, कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे, अशी कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत.   जिल्हा बॅंकांची व्याप्ती

  • एकूण जिल्हा बॅंका  :  ३०
  • मागील वर्षी कर्जवाटप  : ३१,५२७.४३ कोटी
  • कर्जाची वसुली  : ८,४२५.४० कोटी
  • सर्व प्रकारच्या कर्जाची थकबाकी  : २३,१०२.०३ कोटी
  • सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शेती कर्जाची थकबाकी ६२७ कोटी आहे. कर्जमाफीनंतर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार झाले, परंतु कर्जमाफीपूर्वी नियमित कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांकडेच आता थकबाकी वाढली आहे. ‘कोरोना’मुळे रिझर्व्ह बॅंकेने ऑगस्टपर्यंत कर्ज वसुलीस मुदतवाढ दिल्याने ऑगस्टनंतर वसुली अपेक्षित आहे. - शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा बॅंक.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

    Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

    Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

    Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

    Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

    SCROLL FOR NEXT