संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कुरखेडा तालुक्यात सेवा सोसायट्यांचा धान खरेदीवर बहिष्कार

टीम अॅग्रोवन

गडचिरोली  ः कमिशन व हमालीची रक्‍कम मिळत नसल्याने विरोध म्हणून आदिवासी विकास सेवा सोसायट्यांनी धान खरेदीवर बहिष्कार टाकला आहे. कुरखेडा तालुक्‍यातील दहा संस्थांचा यामध्ये समावेश असून मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले.

उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. निवेदनानुसार, या केंद्रांवर गेल्या दीड महिन्यापासून प्रत्येकी दहा हजार क्‍विंटल धानाची खरेदी झाली आहे. मात्र आदिवासी विकास महामंडळाचे असहकार्य व खरेदी प्रक्रियेतील उदासीन धोरणामुळे सोसायट्यांसमोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक सोसायट्यांची खरेदी ही खुल्या ओट्यावर होते. त्यांच्याकडे आता साठवणुकीसाठी जागादेखील शिल्लक नाही. त्यातच महामंडळ धानाची उचल करण्यात दिरंगाई करीत आहे. शासन निर्णयानुसार हमाली व कमिशनची व्यवस्था करणे ही अभिकर्ता म्हणून महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र अद्याप हमाली व कमिशनची रक्‍कम संस्थांना देण्यात आलेली नाही. तसेच शेतकऱ्यांना धानाचे चुकारेही अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील रोष असून त्याचा सामना सेवा सोसायटयांना करावा लागतो.

धान पावसाच्या पाण्याने भिजणार नाही याकरिता ताडपत्र्यांचा पुरवठा देखील महामंडळाने खरेदी केंद्रांना केलेला नाही. अशा वेळी धान खराब झाल्यास दीडपट वसुलीचे पत्र संस्थांना महामंडळाकडून देण्यात येते. अशा धोरणाला कंटाळत दहा केंद्रांनी खरेदी थांबवित बहिष्काराचा निर्णय घेतला. सामूहिक काटा बंद आंदोलन या अंतर्गत करण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. सोसायट्यांच्या मागण्या निकाली काढण्याची मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव तलमले, सचिव हेमंत शेंदरे, सुधाकर वैरागडे, घनश्‍याम ठलाल आदींनी केली आहे.   अशी आहे स्थिती

  • हमाली व कमिशनची रक्‍कम सेवा संस्थांना देण्यात आलेली नाही. 
  • शेतकऱ्यांना धानाचे चुकारेही अद्याप मिळालेले नाहीत
  • धान पावसात भिजू नये यासाठी ताडपत्र्यांचा पुरवठा खरेदी केंद्रांना करण्यात  आलेला नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT