संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात खरिपासाठी मे अखेरपर्यंत ६६ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा सर्वाधिक वाटा आहे. जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाच्या १०१ टक्के पीक कर्ज वाटप करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. 

यंदा जिल्ह्यात १२४० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. यापैकी सहकारी बॅंक व खासगी बॅंकांनी मिळून ८१३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. खासगी बॅंकांसाठी ५५३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप उद्दिष्ट होते. या बॅंकांनी मेअखेर १०,४२५ शेतकऱ्यांना १२१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले. या बॅंकांनी उद्दिष्टाच्या २२ टक्के कर्ज वाटप केले आहे.

जिल्हा बॅंकेने मात्र खासगी बॅंकांच्या तुलनेत कर्ज वाटपात मोठी आघाडी घेतली आहे. विविध संस्थांमार्फत जिल्हा बॅंकेने कर्जपुरवठा करून उद्दिष्टपूर्ती केली आहे. जिल्हा बॅंकेने ८२,४१४ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेला ६८५ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात बॅंकेने ६९२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप कले आहे. अजूनही कर्जवाटप सुरुच असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT