थकीत एफआरपीसाठी आंदोलन
थकीत एफआरपीसाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

थकीत एफआरपीसाठी साखर सहसंचालक कार्यालयाच्या काचा फोडल्या

टीम अॅग्रोवन

नांदेड : एफआरपीनुसार ऊस देयकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. थकीत एफआरपीवर व्याज आकारणी सुरू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. १५) नांदेड येथील साखर सहसंचालक कार्यालयात दिवसभर ठिय्या मांडला. सातत्याने मागणी करूनही त्याकडे संबंधित अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्या फेकल्या.

नांदेड विभागातील कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात एकरकमी एफआरपी न दिलेल्या थकीत रकमेवर व्याज आकारणी सुरू करावी. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याकडे चार वर्षांपासून थकीत असलेली नांदेड, परभणी, हिंगोली तसेच अन्य काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची ४ कोटी २२ लाख रुपयांची येणेबाकी शेतकऱ्यांना मिळेपर्यंत ट्वेंटी शुगर कारखान्याला दिलेला गाळप परवाना रद्द करावा. साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी खुर्चीला मारले जोडे... पहा Video महाराष्ट्र शुगर कारखान्याबाबतच्या निर्णयाविरोधात साखर आयुक्त कार्यालयाने याचिका दाखल करावी. २०१४-१५ मधील ऊसबिलावरील विलंब व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कार्यवाही करावी आदी मागण्यांसाठी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दरनियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.१५)  साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी कोंडून घेत ठिय्या आंदोलन केले.

ऊस शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात साखर आयुक्त कार्यालयाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. वेळप्रसंगी साखर सहसंचालक कार्यालयातच मुक्काम करू, असे श्री. इंगोले यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT