संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या

टीम अॅग्रोवन

सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात बुधवारअखेर (ता.९)  ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याने जिल्ह्यात ६७ हजार ६७१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात पेरणीच्या तसेच भात लागवडीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र तीन लाख १६ हजार ७०१ हेक्टर असून बुधवारअखेर दोन लाख ६२ हजार ३७५ हेक्टरवर म्हणजेच ८२.८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीनला प्राधान्य दिले जात असल्याने या पिकाची सरासरी पेक्षाही जास्त लागवड झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ७५४ हेक्टर असून ६७ हजार ६७१ हेक्टरवर म्हणजेच १०६.१४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे.

सातारा, कराड, पाटण, जावली, वाई, कोरेगाव, खटाव तालुक्यात सोयाबीन जास्त लागवड झाली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत खरिपातील बाजरी हे प्रमुख पीक असल्याने सोयाबीननंतर सर्वाधिक बाजरीची लागवड झाली आहे. बाजरीचे सरासरी क्षेत्र ६४ हजार असून यापैकी ५४ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र २४ हजार २०३ हेक्टर असून त्यापैकी १६ हजार ३९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाच्या हजेरीमुळे भात लागवडीस वेग आला आहे. भात पिकाचे सरासरी क्षेत्र ४९ हजार ८९ हेक्टर असून त्यापैकी ३२ हजार ६७ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. जिल्ह्यात आडसाली उसाची लागवड सुरू असून आत्तापर्यंत आठ हजार ४८ हेक्टर क्षेत्रावर आडसाली उसाची लागवड झाली आहे.   तालुकानिहाय पेरणी (हेक्टर) : सातारा ३०,४७७, जावली १२,४९४, पाटण ५५,३५१, कराड २३,५१७, कोरेगाव २३,५१७, खटाव ३४,०४७, माण ३२,९०१,फलटण १५,३७२, खंडाळा ८,७०९,वाई ११,६४९, महाबळेश्वर ३,४८९.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT