वादळी पावसाने संत्र्याचे नुकसान झाले
वादळी पावसाने संत्र्याचे नुकसान झाले 
मुख्य बातम्या

वादळी पावसाचा मराठवाड्याला दणका

टीम अॅग्रोवन

पुणे  : अचानक आलेल्या वादळी पावसाने मराठवाड्याला रविवारी (ता. २) दणका दिला. नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये रात्री जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अवेळी झालेल्या वादळी पावसामुळे काढणी सुरू असलेल्या तूर, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, फळपिके, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. सोमवारी (ता. ३) सकाळी वर्धा, नागपूरमध्येही हलक्या पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ होऊन थंडी गायब झाली आहे.

रविवारी (ता.२) रात्री नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, लोहा आदी तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पालम, मानवत, पाथरी तालुक्यातील १६ मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत आदी तालुक्यांतील अनेक तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. 

अवकाळी पावसामुळे काढणी सुरू असलेली तूर भिजली. निसवलेले; तसेच कणसावर असलेली ज्वारी, ओंब्यांवर असलेला गहू; तसेच हरभरा पिकांचे नुकसान झाले. मांडखळी, जांब (ता. परभणी) या गावांतील संत्रा फळबागांमध्ये फळगळ झाली. फांद्या मोडल्या. झाडे मुळापासून उपटून पडल्याने संत्रा उत्पादकांना मोठा फटका बसला. आंबा मोहोराचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यातही रविवारी (ता. २) तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सिरसाळा (ता. परळी) भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसाने तुरीचे, रब्बीच्या हरभरा, ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी तूर काढणीत व्यग्र असल्याने अवकाळी पावसाने तारांबळ उडाली. सिरसाळासह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गहू, ज्वारी व आंबा मोहराचे मोठे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT