भौगोलिक मानांकन असलेल्या भिवापुरी मिरचीची माहिती घेताना कृषिमंत्री दादा भुसे. 
मुख्य बातम्या

भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न आवश्यक : कृषिमंत्री दादा भुसे

भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे नावलौकिक प्राप्त असलेल्या भिवापुरी मिरचीचा दर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.

टीम अॅग्रोवन

नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे नावलौकिक प्राप्त असलेल्या भिवापुरी मिरचीचा दर्जा आणि उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे मत कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. कृषी विद्यापीठाने या अनुषंगाने संशोधनात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘कृषी संजीवनी सप्ताहा’निमित्त कृषिमंत्री भुसे यांनी उमरेड व भिवापूर तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. उमरेडचे आमदार राजू पारवे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखडे, उमरेडचे तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, भिवापूरचे राजेश जारोंडे उपस्थित होते.

उदासा येथील प्रवीण वंजारी या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे. त्यांनी योजनांमधून शेडनेट उभारले असून, त्या माध्यमातून भाजीपालावर्गीय पिके, फळांची रोपे तयार करून ते शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे वंजारी यांनी सांगितले. उमरेडलगत अरविंद गिरडकर यांच्या शेतात धान पऱ्हे रोवणी सुरू असताना कृषिमंत्री भुसे यांनी त्याची पाहणी केली.

त्या वेळी उपस्थित महिला शेतमजुरांसोबत धानलावणी, त्यांची मजुरी, कामाच्या वेळांबाबत चर्चा केली. भिवापूर येथील नसीर मलिक यांच्या मिरची सफाई, काटणी केंद्राला भुसे यांनी भेट दिली. भिवापुरी मिरचीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डॉ. नारायण लांबट यांचा कृषिमंत्र्यांनी सत्कार केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २१ निर्णय; अतिवृष्टीच्या मदतीवरून खडाजंगी

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपातही बँकांचा हात आखडता

Bidri Sugar Factory: 'बिद्री'चा उच्चांकी ३,६१४ रुपये ऊसदर जाहीर, शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश, अवघ्या आठवडाभरात दरात बदल

Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार

Anjani Project : अंजनी प्रकल्पासह वसंत कारखाना पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT