Mustard Production
Mustard Production 
मुख्य बातम्या

देशात यावर्षी विक्रमी ११३ लाख टन मोहरी उत्पादनाचा अंदाज

टीम ॲग्रोवन

चालू रब्बी हंगामात मोहरीचे (Mustard Production) विक्रमी ११३ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर ऑइल इंडस्ट्री अँड ट्रेड (Central Organisation For Oil Industry And Trade ) म्हणजेच सीओओआयटी (COOIT) या संस्थने वर्तविला आहे. मागील महिन्यात संस्थेने ११० लाख टन मोहरी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. बिझनेस लाईनने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचा - टुटाच्या विळख्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी   दोन दिवसीय वार्षिक परिषदेच्या शेवटच्या दिवशी संस्थेने राज्य निहाय उत्पादनाचा (State wise Mustard Production) अंदाज जाहीर केला. यावर्षी ९१ लाख हेक्टर क्षेत्रात मोहरी लागवड करण्यात आली असून ११४.६ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्तविला आहे. मात्र यावर्षी मोहरीचे एकूण उत्पादन ११३ लाख टन राहील, असे सीओओआयटीने म्हटले आहे. सरकारी अंदाजानुसार, उत्तर प्रदेशात मोहरी प्रकारातील टोरियाखालील क्षेत्र चार लाख हेक्टर आहे.  

या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये मोहरी उत्पादन ५१ लाख टन होण्याची शक्यता आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात १७ लाख टन, तर मध्य प्रदेशात १२.५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

यावेळी आयसीएआरच्या मोहरी संशोधन विभागाचे संचालक पी. के राय म्हणाले की, “उत्पादनातील तफावत कमी झाल्यास भारतातील मोहरीचे उत्पादन ३०-३५ टक्क्यांनी वाढू शकते. मोहरी उत्पादन वाढीसाठी मोहरी तेल उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, शेतकरी, संशोधकी आणि मोहरी संशोधन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून एक विशेष कृती गट स्थापन करण्याचे आवाहन राय यांनी केले आहे. हवामान बदल,वेळेवर बियाणे न मिळणे, उत्पादन तंत्रज्ञानाच्या अभाव अशा अनेक कारणांमुळे उत्पादन कमी होते.

पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या पूर्वेकडील राज्यांमधील प्रति हेक्टर ०.७४-०.७९ टन उत्पादकतेच्या तुलनेत राजस्थानमध्ये उत्पादकता प्रति हेक्टर १.४६ टन असण्याची शक्यता सीओओआयटीने व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

Sugarcane Harvester : ऊस तोडणीयंत्र कर्ज सुलभ करण्याच्या सूचना

Cotton value Addition : कापसाच्या मूल्यवर्धनातून नागपूरचे शेतकरी ‘स्मार्ट’

Betel Leaf : पानांची आवक घटली; दरात चांगलीच वाढ

Cotton Rate : प्रतीक्षा करूनही वाढेनात कापसाचे दर

SCROLL FOR NEXT