शनिवारी (ता. २१) मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले होते. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका पुन्हा वाढल्याचे दिसून आले. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्याच्या बहुतांशी भागात मुख्यत: निरभ्र आकाश आहे. अनेक भागांत वाऱ्याचा वेग वाढला आहे. आज (ता. २३) कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३४.६, नगर ३९.४, धुळे ४१.५, जळगाव ४०.८, कोल्हापूर २८.८, महाबळेश्वर २७.०, नाशिक ३४.२, निफाड ३४.८, सांगली २९.४, सातारा ३२.१, सोलापूर ३३.८, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३१.७, औरंगाबाद ३८.३, परभणी ३९.३, नांदेड ४०.८, अकोला ४१.८, अमरावती ४२.४, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४३.८, चंद्रपूर ४३, गोंदिया ४४.५, नागपूर ४३.४, वर्धा ४३, यवतमाळ ४२.५.
मॉन्सूनची प्रगती नाही
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. २०) मॉन्सूनने अरबी समुद्रात वाटचाल केली आहे. दक्षिण अरबी समुद्र, मालदीवच्या दक्षिणेकडील भागात मॉन्सून दाखल झाला आहे. तर पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने आगेकूच केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचालीची स्थिती ‘जैसे थे’ असून कोणतीही प्रगती केलेली नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.