Ukraine
Ukraine 
मुख्य बातम्या

निवडक शहरांमध्ये युक्रेनकडून शस्त्रसंधी

टीम अॅग्रोवन

लव्हिव : नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावे यासाठी युक्रेन सरकारने सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरक्षित मार्गांवर आणि काही शहरांमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली आहे. त्यांच्या या शस्त्रसंधीला रशियाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.  

सुरक्षित मार्गांवर शस्त्रसंधी जाहीर करत असल्याचे युक्रेनच्या उपपंतप्रधान(Deputy Prime Minister) आयरिना व्हेरेश्‍चुक यांनी सांगितले. सुमी शहराबरोबरच मॉरिपोल, एनरहोदर, व्होल्नोवाखा, इझिअम आणि किव्ह प्रदेशातील अनेक गावांमधून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून या सर्वठिकाणी युक्रेनने एकतर्फी शस्त्रसंधी(Arms) जाहीर केली आहे. हे सुरक्षित मार्ग ज्या शहरांपर्यंत पोहोचतात, तो सर्व प्रदेश युक्रेन सरकारच्या ताब्यात आहे.

हे हि पहा : 

युद्धाच्या आजच्या १४ व्या दिवशी युक्रेनच्या(Ukraine) दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या मॉरिपोल या शहराचा ताबा मिळविण्यासाठी रशियाच्या सैनिकाने विशेष जोर लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून वेढा घातलेल्या या शहरावर रशियाच्या रणगाड्यांनी तोफगोळ्याचा जोरदार मारा केला. त्यामुळे नागरिकांना तळघरांमध्ये आश्रय घ्यावा लागला होता.

मॉरिपोलमध्ये गेल्या आठवड्यापासून वीज आणि पाणी नाही. बाहेर हिमवर्षाव होत असताना उबदार ठेवणारी यंत्रणा वीजेविना बंद पडली आहे. अनेक नागरिक शहर सोडण्याची धडपड करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. या नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग जाहीर केल्यानंतरही त्यावरच रशियाच्या सैनिकांनी बाँबहल्ले केल्याने नागरिक शहरातच अडकून पडले आहेत. सुमी शहरातून मात्र ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध झाल्याने आतापर्यंत पाच हजार नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यात बहुतांश भारतीयांचा समावेश असल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

रशियाच्या हवाई दलाच्या विमानांनी काल (ता. ८) रात्री खारकिव्ह, झायटोमिर, किव्ह आणि इतर काही शहरांवर बाँबवर्षाव केला. या हल्ल्यात पाच ते आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही कारखाने नष्ट झाले. युद्धग्रस्त शहरांमधून सुमारे दोन लाख लोक लव्हिव शहरात आश्रयाला आले असून त्या लोकांचे राहण्याचे आणि अन्न-पाण्याचे हाल होत आहेत. या लोकांना शहरातील क्रीडा स्टेडियम आणि इतर काही इमारतींमध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT