Amul Milk 
मुख्य बातम्या

अमूल दुधाच्या विक्री दरात २ रुपयांची वाढ

देशात दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असतानाच अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. अमूल ही डेअरी व्यवसायातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. संपूर्ण देशात अमूलने दरवाढीची घोषणा केली आहे. अमूलने दूध दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.

टीम ॲग्रोवन

देशात दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असतानाच अमूलने दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. अमूल ही डेअरी व्यवसायातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. संपूर्ण देशात अमूलने दरवाढीची घोषणा केली आहे. अमूलने दूध दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे.  

AMUL increases the price of milk by Rs 2. The prices will come into effect from tomorrow (March 1, 2022) pic.twitter.com/R2IeDQFtOo

— ANI (@ANI)

अमूलच्या नव्या दरवाढीनुसार, गुजरातच्या अहमदाबाद आणि सौराष्ट्राच्या बाजारपेठेत अमूल गोल्डच्या अर्धा लिटर दुधाची किंमत ३० रुपये असणार आहे. तर अमूल ताजाची अर्धा लिटरसाठीची किंमत २४ रुपये असणार आहे. याशिवाय अमूल शक्तीची किंमत २७ रुपये प्रति अर्धा लिटर असणार आहे. नवी दरवाढ ही १ मार्चपासून लागू होणार आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दुधाच्या दरात वाढ केली आहे. यापूर्वी जुलै २०२१ मध्ये दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. अमूल दुधाच्या सर्व ब्रँडवर ही दरवाढ लागू होणार आहे. यामध्ये टी-स्पेशल, सोना, ताजा, शक्ती याशिवाय गाय आणि म्हशीचे दूध इत्यादींचा समावेश आहे. तब्बल सात महिने २७ दिवसांनी दरात वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ हेच किमती वाढण्याचे कारण असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचा - भारतातून ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ ; पेरूची निर्यात २६० टक्के वाढली अमूलने जाहीर केलेल्या नव्या दरवाढीवर सांगितले की, २ रुपयांची वाढ ही प्रति लिटरच्या वाढीमागे अन्नधान्याच्या सरासरी महागाईपेक्षा खूपच कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अमूलने आपल्या ताज्या दुधाच्या श्रेणीत दरवर्षी ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ऊर्जा, पॅकेजिंग, वाहतूक आणि पशुखाद्य यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कामकाजाचा खर्च वाढला आहे. हे पाहता अमूलने शेतकऱ्यांचा दूध खरेदी दर ३५ रुपयांवरून ४० रुपये प्रति किलो केला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टक्के अधिक आहे. दुधाच्या खरेदीवर भरलेल्या प्रत्येक रुपयापैकी सुमारे ८० पैसे शेतकऱ्यांना परत केले जातात, असे अमुलने म्हटले आहे. दुधाचे दर वाढल्याने इतर दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढणार आहेत. त्यामुळे तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम, ताक याबरोबरच चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटचे भावही वाढणार आहेत. अशा स्थितीत दुधाच्या वाढत्या किमतींसोबतच सर्वसामान्यांच्या बजेटला आणखी एक झटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT