‘एनएचएम'चा सर्व्हर डाउन, शेतकऱ्यांना डोकेदुखी
‘एनएचएम'चा सर्व्हर डाउन, शेतकऱ्यांना डोकेदुखी 
मुख्य बातम्या

‘एनएचएम'चा सर्व्हर डाउन, शेतकऱ्यांना डोकेदुखी

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः राज्य शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानातील (एनएचएम) लाभासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पण अतिशय धीम्या गतीने ऑनलाइन सर्व्हर चालत असल्यामुळे महा-ई-सेवा केंद्रावर तासनतास शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहण्याची वेळ येत  आहे. त्यातच खरिपाच्या पेरण्याच्या घाई, पीककर्जासाठी बॅंकांकडे हेलपाटे यात तो व्यस्त असताना, ई सेवा केंद्रावरील ‘सर्व्हर डाउन''मुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ‘एनएचएम’मधून यंदाच्या वर्षी कांदाचाळ, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्च प्रतीचा भाजीपाला लागवड, हरितगृहातील फूल लागवड, २० एचपी ट्रॅक्‍टर, पॉवरऑपरेटर स्प्रेपंप, पॅकहाउस, शीतगृह, पूर्व शीतकरण गृह, शीतगृह, रेफर व्हॅन, रायनपनिंग चेंबर, अंळबी उत्पादन प्रकल्प, प्लॅस्टिक मल्चिंग, सामूहिक शेततळे, प्राथमिक प्रक्रिया केंद्र (फळे, भाजीपाला, मसाला, हळद, मिरची, काजू, बेदाणा) मधुमक्षिकापालन आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. या अभियानासाठी पूर्वी जिल्हा स्तरावर अर्ज स्वीकृती करून शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता; पण शासनाने यंदाच्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवून लाभासाठी ‘पारदर्शकता'' आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण सध्या तो शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत आहे. त्यात ई-सेवा केंद्रावरच हे अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी ‘हॉर्टिनेट'' या शासनाच्या वेबसाइटवरच अर्ज भरता येणार असल्याने एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज डाउनलोड होत आहेत.  त्यातच शेतकऱ्यांचा फोटो, सात-बारा उतारा, खाते उतारा, आधार कार्ड छायाकिंत प्रत, आधाल संलग्न बॅंक पासबुक, जातीचा दाखला, ॲप्लिकेशन फॉर्म आणि हमीपत्र ही सगळी कागदपत्रे स्कॅन करून फॉर्मसोबत दाखल करावयाची आहेत. त्यातही तास-दीड तास जातो आहे. त्यातच मध्ये सर्व्हर डाउन झाला की पुन्हा दीड-दोन तास थांबावे लागत आहेत. साहजिकच, एका केंद्रावर दिवसाला १० ते १५ शेतकरीही अर्ज भरु शकत नाहीत. अर्ज भरल्यानंतर पुन्हा या अर्जाची प्रत ऑफलाइन पद्धतीने तालुका कृषी कार्यालयात जमा करावयाची आहे. ऑनलाइन अर्जासाठी १ ते २० जून एवढा कालावधी त्यासाठी दिला आहे. पण या कालावधीत जादा संख्येने शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल का? याबाबत साशंकताच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT