बोंडअळी मदतीवरून विरोधकांचा गोंधळ
बोंडअळी मदतीवरून विरोधकांचा गोंधळ 
मुख्य बातम्या

बोंडअळी मदतीवरून विरोधकांचा गोंधळ

टीम अॅग्रोवन

नागपूर ः बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी सभागृहात हेक्‍टरी ३४ हजार ७०० रुपयांची घोषणा करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन हजार रुपये पडले. त्यामुळे सभागृहातच अशा प्रकारे खोट बोलले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सोमवारी (ता. ९) विधान परिषदेत गोंधळ घातला. गोंधळामुळे तीनदा सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरूच असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विधान परिषदेचे पहिल्या आठवड्याचे कामकाज कोणत्याही चर्चेविनाच पार पडले. दुसऱ्या आठवड्यात कामकाजाला गती येईल, शेती, सिंचन या प्रश्‍नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बोंडअळीची जाहीर केलेली हेक्‍टरी ३४ हजार ७०० रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नियम ३८९ अन्वये यावर चर्चा घडवून आणावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. परंतु सभापतींनी प्रस्ताव नाकारत प्रश्‍नोत्तरे सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोनदा कामकाज अर्धा-अर्धा तास तहकूब करण्यात आले. त्यानंतरही विरोधक जुमानत नसल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT