माॅन्सून 
मुख्य बातम्या

दिल्ली, हरियाना, पंजाबमध्ये माॅन्सूनची प्रगती

टीम अॅग्रोवन

पुणे ः माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने गुरुवारी (ता. २८) माॅन्सूनने दिल्ली, हरियाना, पंजाबसह, राजस्थानच्या काही भागांत माॅन्सूनची प्रगती केली आहे. त्यामुळे या भागात आज (ता. २९) आणि उद्या (ता. ३०) मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, जम्मू आणि काश्मीर या राज्यांचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थानकडे सरकला असल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले.  पाकिस्तान व राजस्थानच्या पश्चिम पट्ट्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने माॅन्सूनची प्रगती होत आहे. राजस्थानच्या वेरावल, अमरेली, जोधपूर, बिकानेरपर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गुजरात आणि राजस्थानच्या आणखी काही भागांत माॅन्सून वाटचाल करेल. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू आणि हिमाचल प्रदेशमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. उत्तर प्रदेशात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली, तरी उद्या (शनिवारी) आणि रविवारी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT