पेरणी
पेरणी  
मुख्य बातम्या

खरिपाचा पेरा ११६ लाख हेक्टरवर

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात आतापर्यंत खरिपाची पेरणी ११६ लाख हेक्टवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत यंदा कमी पेरा झाला आहे. मागील वर्षी १२८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे.  देशातील अनेक भागात सध्या मॉन्सूनचा जोर कमी झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. सुरवातील जोरदार पावसाने हजरी लावल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने ठिक ठिकाणी हजेरी लावली; परंतु त्यामुळे पेरणी वाढण्यास मदत झाली नाही. देशात खरिपाचा पेरा आतापर्यंत ११६ लाख हेक्टरवर झाला आहे. मागील वर्षी याच काळात १२८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील पाच वर्षांतील याच काळातील सरासरी पेरणी ही १२५ लाख हेक्टरवर होती. यंदा या सरासरीपेक्षाही कमी पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक भाताची पेरणी ११ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षीही या काळात एवढीच पेरणी झाली होती. देशात मॉन्सून दाखल होताच पेरण्यांनी वेग घेतला; परंतु पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबविल्या. उघडिपीच्या काळात दुबार पेरणीचे संकट येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी न करण्यास प्राधान्य दिले. सध्या झालेल्या पेरणीत कडध्यान्याची पेरणी कमी झाली आहे. मागील हंगामात कडधान्यांना हमीभावापेक्षीही कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांना प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत देशात ५ लाख ९१ हजार हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली. मागील वर्षी याच काळात ७ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. कडधान्यामध्ये तूर आणि कुल्थीचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा वाढले आहे. तर उडीद, मूग आणि इतर कडधान्यांचा पेरा घटला आहे.  आता मॉन्सून अनेक भागात पुन्हा सक्रिय होत असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी पेरणीला प्रारंभ करतील आणि खरिपाचा पेरा वाढेल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT