कापूस गाठी
कापूस गाठी 
मुख्य बातम्या

कापूस बाजारात भारताला संधी

टीम अॅग्रोवन

न्यूयाॅर्क ः चालू कापूस हंगामात पिकाला फटका बसल्याने जगात सर्वात मोठा आयातदार ठरलेला चीन आणि सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश अमेरिका, या दोन्ही देशांमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार विविद आणखी बिघडले आहेत. चीन येणाऱ्या काळात आणखी कापूस आयात करण्याच्या तयारीत आहे, तर भारताकडे निर्यातीसाठी कापूस उपलब्ध आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनच्या व्यापार विवादात भारताला लाभ होऊ शकतो. चीनमध्ये चालू कापूस हंगामात कापूस पिकाला फटका बसला त्यामुळे उत्पादन घटले आहे. तसेच देशांतर्गत गरज भागविण्यासाठी चीनने यापूर्वीच मोठी आयात केली आहे. चीनला आणखी कापूस आयात करण्याची गरज भासणार आहे. त्यातच आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोत मोठा कापूस निर्यातदार अमेरिका ठरत आहे. मात्र अलीकडच्या काळात अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये व्यापार विवाद वाढला आहे. त्यामुळे भारताला चीनमध्ये कापूस निर्यात करण्याची संधी आहे. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया स्वस्त झाल्याने त्याचा लाभ कापूस निर्यात करण्यास होईल. इतर आशियाई देशांच्या तुलनेत भारतीय कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त झाला आहे. ‘‘मंगळवारी (ता.१९) झालेल्या व्यवहारात कापूस दर न्ययॉर्कच्या बाजारात आयसीई फ्युचरमध्ये एक्सचेंज लिमिटमुळे तुटले होते. दर चार वर्षीच्या ९४.८२ सेंटच्या उच्चांकीवरून १२ टक्के घसरले होते. या वेळी चीनने अमेरिकेतून जवळपास १५ लाख गाठी कापसाची खरेदी केली. मात्र व्यापारी आता हा झालेला व्यवहार रद्द करण्याच्या विचारात आहेत,’’ अशी माहिती मेंमफीस येथील रोज कमोडीटी ग्रुपचे संशोधन आणि विश्लेषण संचालक लुईस रोज यांनी दिली. चीन, अमेरिकेत उत्पादन घटण्याची शक्यता कॉटन असोसिएशन आॅफ इंडियाने मागील आठवड्यात या हंगामात कापूस उत्पादन ८.३ टक्क्यांनी वाढणार आहे आणि त्यामुळे निर्यातीला चालना मिळेल. चीनमध्ये २०१५ च्या विक्रमी कापूस उत्पादनानंतर येथे कापूस लागवड घट आणि पिकाला फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यामुळे येथील सरकारने देशांतर्गत पिकाला हवामानाचा फटका बसल्याने देशातील चांगल्या लांब धाग्याच्या कापसाचा होणार तुटवडा भरून काढण्यासाठी अतिरिक्त आयात कोट्याला मान्यता दिली आहे. तसेच अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक पश्चिम टेक्सास मध्ये दुष्काळी स्थिती असल्याने येथे कापूस पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेत कॉटन फ्युचरमध्ये यंदा २१ टक्के वाढ झाली आहे.    प्रतिक्रिया मंगळवारी (ता.१९) झालेल्या व्यवहारात कापूस दरचार वर्षीच्या ९४.८२ सेंटच्या उच्चांकीवरून १२ टक्के घसरले होते. आम्ही कापूस दरात ज्या वेगाने वर गेलो होतो त्याच वेगाने खालीसुद्धा येत आहेत. - लुईस रोज, संशोधन आणि विश्लेषण संचालक, रोज कमोडीटी ग्रुप, मेंमफीस, अमेरिका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT