कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर
कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर 
मुख्य बातम्या

फळपिकांसह एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिकू या प्रमुख पिकांच्या एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) राबविण्यासाठी ४१ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.  कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, की क्रॉपसॅप योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या प्रमुख पिकांसह आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिकू या प्रमुख फळपिकांचा समावेश राहील. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात यावी व त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन व संगणक प्रणालीचा वापर करण्यात यावा.  सदर योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या संगण्क प्रणालीमध्ये कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांची स्काऊट म्हणून व मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांची त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नोंदणी करण्यात यावी व त्यांना कीड व रोग सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात यावी. योजनेच्या नियोजन व संनियंत्रणासाठी राज्य पातळीवर कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. क्रॉपसॅप योजनेअंतर्गत पिकांवरील प्रमख कीड व रोगांचे सर्वेक्षण करून त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मोबाईल ॲपद्वारे व एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले देण्यात यावेत. संबंधित पिकाच्या विकासाच्या विविध महत्त्वपूर्ण टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीवर पोचण्यापूर्वी संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण करावे, असेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT