कोंडीग्रे, जि. कोल्हापूर ः येथील श्रीवर्धन बायोटेक येथे फुले निर्यातीसाठी सुरू असलेली धांदल.
कोंडीग्रे, जि. कोल्हापूर ः येथील श्रीवर्धन बायोटेक येथे फुले निर्यातीसाठी सुरू असलेली धांदल. 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातून दहा लाख गुलाबांची निर्यात

Raj Chougule

कोल्हापूर : प्रमीजनांचा उत्सव मानला जाणाऱ्या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी असते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, कुवैत आणि जपानमध्ये कोल्हापूरच्या फुलांसह प्रेमीजन आपले नाते दृढ करणार आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे दहा लाख गुलाब फुलांची परदेशात निर्यात करण्यात आली. या काळात लाल रंगाच्या गुलाबाला अधिक मागणी असते. एकूण निर्यातीपैकी आठ लाख लाल गुलाब असल्याचे सांगण्यात येते. कोल्हापूर भागातील मोठे निर्यातदार असलेल्या श्रीवर्धन बायोटेकमध्ये गत पंधरा दिवसांपासून गुलाब निर्यातीची धांदल सुरू आहे. निर्यातीशिवाय स्थानिक बाजारपेठेमध्येही गुलाब फुलांच्या मागणीमध्ये वाढ अपेक्षित असून, पॉलिहाउसमध्ये उत्पादन घेणाऱ्या अनेक गुलाब उत्पादकांनी स्थानिक बाजारपेठेसाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या श्रीवर्धन बायोटेक येथे गुलाबाच्या पंधराहून अधिक जातींचे उत्पादन घेतले जाते. त्यात लाल रंगाच्या पॅशन, फर्स्टरेड, टेम्प्टेशन, ग्रॅंडगाला, रॉयल बकारा या जातींना चांगली मागणी असते. याशिवाय जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड ही फुलेही मोहिनी घालतात. या वर्षी "व्हॅलेंटाइन डे'साठी आठ लाख गुलाबांची निर्यात करण्यात आली आहे. खरेतर याचे नियोजन डिसेंबरअखेरपासून सुरू होते. फुलांची काढणी आणि पॅकेजिंगसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून धांदल सुरू आहे. अर्धवट उमललेल्या कळ्या तोडल्यानंतर त्याचा उन्हाशी संपर्क येऊ न देता त्वरित पूर्वशीतीकरण करून चार अंश सेल्सिअस तापमानामध्ये ठेवल्या जातात. यामुळे कळ्यांची उमलण्याची प्रक्रिया थांबते. यानंतर फुलांची प्रतवारी लांबी आणि दर्जानुसार केली जाते. यातील लांब दांड्यांच्या फुलांना अधिक दर मिळतो. मागणीनुसार ४० ते ७० सेंमी लांबीचे दांडे ठेवून १० ते २० फुलांचे बंच तयार केले जातात. फुलांची तोडणी केल्यापासून परदेशांतील बाजारपेठेत ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत फुलांची विशेष काळजी घेतली जाते. विविध विद्यापीठांतील नव्या प्रयोगांसह संशोधनाचा अभ्यास करत गणपतराव पाटील यांनी कोल्हापूर परिसरात फूलशेती यशस्वी केली आहे. या वर्षीही "श्रीवर्धन बायोटेक'चा गुलाब इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, कुवैत आणि जपानमधील प्रेमीजनांतील नाते दृढ करणार आहे.   "व्हॅलेंटाइन डे'साठी आठ लाख गुलाबांची निर्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्व लाल गुलाबांचा समावेश आहे. अत्यंत काळजीपूर्वक उत्पादित केलेल्या फुलांची काढणीनंतर केवळ तीन ते चार दिवसांत प्रतवारीनंतर उत्तम पॅकेजिंग करून परदेशी पाठवला जातो. वातानुकूलित वाहनांच्या शीतसाखळीतून विमानाद्वारे वाहतुकीने निर्धारित बाजारपेठेमध्ये मागणीनुसार पाठवला जातो. गेल्या वीस वर्षांपासून "श्रीवर्धन बायोटेक' गुलाब परदेशातील बाजारात विशेष आकर्षण ठरत आहे. - रमेश पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीवर्धन बायोटेक, कोंडीग्रे) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT