प्रत्यक्ष शेतामध्येच विषाणूंचा प्रादुर्भावाचे निदान करणे आता शक्य होणार आहे. (स्रोत ः डॉ. फिलॉक्स, किराड)
प्रत्यक्ष शेतामध्येच विषाणूंचा प्रादुर्भावाचे निदान करणे आता शक्य होणार आहे. (स्रोत ः डॉ. फिलॉक्स, किराड) 
मुख्य बातम्या

वनस्पतीतील विषाणूंच्या त्वरित निदानासाठी नॅनोपोर तंत्रज्ञान

वृत्तसेवा

विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सर्व सजीवाबरोबरच वनस्पतींमध्ये रोग येत असतात. विषाणूजन्य रोगांवर उपचार करणे अत्यंत कठीण मानले जाते. सीआयआरएडी संस्थेतील संशोधकांनी याम वनस्पतीमध्ये येणाऱ्या दोन विषाणूंचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण केले आहे. यासाठी त्यांनी नॅनोपोर हे मूलद्रव्यी जीवशास्त्रातील अत्यंत आश्वासक असे तंत्रज्ञान वापरले आहे. या पद्धतीमुळे केवळ वनस्पतीच नव्हे, तर सजीवांसह मानवी रोगांचे निदान करणे सोपे होऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी आणि सजीवांच्या आरोग्यासाठी विषाणूंचे निदान करण्याचे लहान आणि सहजतेने नेण्यायोग्य तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचा वापर प्रामुख्याने चालत्या प्रयोगशाळांमध्ये इबोला किंवा झिका यांसारख्या विषाणूजन्य रोगांच्या निदानांसाठी केला जात असे. हे निदान त्वरित आणि वेगाने होत असल्याने अतिसंसर्गजन्य अशा रोगांच्या प्रसाराला अटकाव करणे शक्य होते. असे रुग्ण त्वरित वेगळे करून त्यांच्यावरील उपचारांना सुरवात करता येते. किराड संस्थेतील विषाणूतज्ज्ञ फिलिपे रौमॅग्नॅक आणि त्यांचे सहकारी डेनिस फिलौक्स यांनी सांगितले, की आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ अशा न्युक्लिओटाईच्या उत्पादनाचे गुणधर्म मिळवणे शक्य झाले असून, त्यातून संपूर्ण विषाणूंच्या जनुकीय संरचना उपलब्ध झाली आहे. मात्र, असे तंत्रज्ञान वनस्पतीमध्ये होणाऱ्या विषाणूंच्या निदानासाठी उपलब्ध नव्हते. अशा जागतिक पातळीवरील पहिलीच सोय किराड संस्थेमध्ये करण्यात आली आहे. रोगग्रस्त याम वनस्पतींच्या साह्याने केवळ काही तासांमध्ये दोन विषाणू मॅकल्युराव्हारस आणि पॉटीव्हायरस यांचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण करणे या तंत्रामुळे शक्य झाले आहे. या संशोधनामध्ये सीआयआरएडीच्या आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटामध्ये भारतातील टी. मुकेशकुमार यांचाही समावेश होता. या प्रकल्पासाठी अॅग्रोपोलिस फाउंडेशन यांच्या वतीने अर्थसाह्य मिळाले. नव्या तंत्रज्ञानाचे फायदे ः

  • नॅनोपोर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वनस्पतीच्या विषाणूंच्या निदानासाठी केल्यामुळे अनेक फायदे होणार आहे.
  • प्रयोगशाळेमध्ये वेगळ्या केलेल्या नमुन्यामध्ये किंवा शेतामध्ये प्रत्यक्ष वेळेवर घेतलेल्या नमुन्याचे त्वरित निदान करणे शक्य होणार आहे.
  • यात वेळेची बचत झाल्याने उपचारांना सुरवात करणे शक्य होईल. त्यातून यशाच्या शक्यता वाढणार आहेत. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Seed : राज्यात कापूस बियाण्याची विक्री १६ मे पासून होणार

    Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

    Mango Export : युद्धामुळे आंबा निर्यात थंडावली

    Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

    Strawberry Party : शाळेत रंगली ‘स्ट्रॉबेरी पार्टी’

    SCROLL FOR NEXT