Surangi Season : सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Surangi Rate : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून सुरंगीच्या कळ्यांना प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये तर फुलांना ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे.
Surangi
SurangiAgrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरंगीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून सुरंगीच्या कळ्यांना प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये तर फुलांना ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. आणखी आठ ते दहा दिवस हा हंगाम चालेल, असा अंदाज आहे.

Surangi
Surangi Conservation : कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलाय सुरंगी संवर्धनाचा वसा

जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडीसह इतर तालुक्यांतील १५ हुन अधिक गावांमध्ये सुरंगीचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वडखोल सोन्सुरे, टाक, आसोली, रेडी, खानोली, फणसखोल, मोचेमाड (ता. वेंगुर्ला) धाकोरे, कोलगाव, कुणकेरी, (ता. सावंतवाडी) आकेरी (ता. कुडाळ) फोंडा (ता. कणकवली) करूळ (ता. वैभववाडी) या गावांचा समावेश आहे.

Surangi
Surangi Rate : सुरंगीला प्रतिकिलो ७०० रुपये दर

यावर्षी साधारणपणे १५ मार्चपासून यावर्षी हंगामाला सुरुवात झाली. बटमोगऱ्याला सध्या प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये दर असून सरसकट प्रतिकिलो ४०० ते ४५० रुपये दराने सुरंगी खरेदी केली जात आहे. सुरंगीचा हंगाम अजून आठ दिवस दिवस चालेल, असा अंदाज आहे. सुरंगीला मुंबईत मोठी मागणी आहे. स्थानिक शेतकरी शिरोडा बाजारपेठेत विक्री करतात.

सुरंगीचा हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी कळीला ७०० रुपये तर मिश्रीत फुलांना ४०० ते ४५० रुपये दर मिळत आहे. अजूनही आठ ते दहा दिवस हंगाम चालेल.
तातोबा कुडव, सुरंगी उत्पादक, आरोली, ता. वेंगुर्ला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com