प्रदर्शनात आकर्षण ठऱलेला बैल
प्रदर्शनात आकर्षण ठऱलेला बैल  
मुख्य बातम्या

तब्बल टन वजनाचा बैल ठरला प्रदर्शनाचे आकर्षण 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : साधारण उंची आणि वजनाचे बैल पाहणाऱ्या सर्वांसाठी तब्बल एक टन वजनाचा गज्या नावाचा बैल सकाळ ॲग्रोवन तर्फे आयोजित कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरला आहे. प्रदर्शनाला भेट देणारी प्रत्येक व्यक्ती गज्याला पाहायल्याशिवाय घरी जात नाही हे विशेष. 

कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील कृष्णा यशवंत सायमोते यांच्या मालकीचा हा बैल आहे. त्याचा जन्म एक ऑक्टोबर २०११ चा आहे. त्याचे मालक सायमोते म्हणाले, की देशी आणि जर्सी वंशाच्या संकरातून गज्याचा जन्म झाला आहे. जवळपास आठ वर्षे वय असलेल्या गज्याची बालपणापासूनच विशेष काळजी घेतली जात आहे. त्याची उंची सहा फूट तर लांबी १० फूट आहे.  त्याचा एकूणच आकार सर्वसाधारण बैलासारखा नाही. त्यामुळे इतर सर्वसाधारण बैलांना गज्याची जोड शक्य नाही. त्यामुळे त्याचा क्वचित प्रसंगी एकबैली गाडीसाठी वापर केला जातो. गज्याला पाहणा-यांची संख्या मोठी असल्याने त्याला विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असलेल्या प्रदर्शनांमध्ये मोठी मागणी असते. प्रत्येक ठिकाणी तो सर्वांच्या कुतूहलाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सकाळ अॅग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्याच दिवशी जवळपास २ हजार व्यक्तींनी गज्याला प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटला. दुस-या दिवशीही गज्या ला पाहणा-यांची रिघ सुरूच होती.  दहा फूट लांब आणि ६ फूट उंच बैल..! पहा video..

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT