आयटी इंजिनिअर जेव्हा शेतीत उतरतात...
आयटी इंजिनिअर जेव्हा शेतीत उतरतात... 
मुख्य बातम्या

आयटी इंजिनिअर जेव्हा शेतीत उतरतात...

टीम अॅग्रोवन

आयटी इंजिनिअर ते आॅनलाइन दूध, शेतमाल विक्रीचे ‘स्टार्टअप`व्हाया प्रत्यक्ष मातीतला शेतकरी असा जयवंत आणि मालविका यांचा प्रवास चढ-उतारांचा आहे. आता शेती करायचे म्हणजे एकेकट्याने राबण्यात अर्थ नाही, तसेच नुसतं पिकवून भागणार नाही, तर समूहशक्तीची वज्रमूठ करून शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी भरून काढावी लागेल. तरच भविष्यात शेतीधंद्यात टिकून राहता येईल नव्हे; नवी भरारी घेता येईल.  ‘‘मी शहरी भागात राहणारा आयटी इंजिनिअर. शेतीची पार्श्वभूमी नाही. शिक्षणानंतर पुण्यातील नामवंत आयटी कंपनीत नोकरी सुरू केली. दरम्यानच्या काळात शेतीची आवड निर्माण झाली. दोन वर्षे अभ्यास केला. शेतीत काहीतरी करावे, अशी मनाने उचल खाल्ली. मित्रांशी बोललो, त्यातले दोघे तयार झाले. मग आम्ही तिघांनी गुंतवणूक करून वाडेगव्हाण (ता. पारनेर, जि. नगर) गावात साडेअकरा एकर शेती घेतली. पाण्याची सोय केली. दर आठवड्याला शुक्रवार ते रविवार शेतीवर जाऊ लागलो. शेतावर मजूर जोडपे होते. ते दैनंदिन काम करायचे. आजूबाजूचे शेतकरीही पीक व्यवस्थापनात मदत करायचे. परिसरातील शेतकऱ्यांच्या चर्चेतून नवरात्र, दिवाळीचा हंगाम साधण्यासाठी चार एकर झेंडू लावला. पीकही दृष्ट लावण्यासारखे निघाले. मन खूश झाले. आता चांगले पैसे होणार, या आनंदात पिकअपमध्ये झेंडू भरून दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री दोन वाजता पुण्यात गुलटेकडी मार्केटमध्ये पोचलो. बाजार सुरू झाला. दर निघाला ५ ते ७ रुपये किलो. काही केल्या त्या सकाळी झेंडूचा दर चढलाच नाही. अशाश्वत बाजारपेठेचा पहिला जोरदार फटका बसला. कसाबसा झेंडू विकून परत आलो ते नवीन धडा शिकूनच. आपले ज्ञान ज्या विषयात आहे आणि ज्या भागात आपण राहतो तिथल्या बाजारपेठेचा अभ्यास करूनच शेती करायची. आपल्याला पिकवणे आणि विक्री जमली नाही; परंतु माहिती तंत्रज्ञानाचे हत्यार आपल्या हातात आहे. त्यातून शेतमालाचे आॅनलाइन मार्केट, ॲप विकसित करायचे...``जयवंत पाटील हा तरुण उद्योजक सांगत होता.  ही गोष्ट २००९ ची. शेतीत मोठा फटका बसला. त्यानंतर गेल्या सात वर्षांत शेती, शेतकरी आणि बाजारपेठेच्या अभ्यासातून जयवंत पाटील आणि त्याची सहकारी मालविका गायकवाड यांनी ऑनलाइन मार्केटिंगवर लक्ष केंद्रित केले. त्या अथक धडपडीतून त्यांनी ‘द आॅरगॅनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड` या कंपनीची एप्रिल २०१६ मध्ये नोंदणी केली. ब्रँड ठरवला ‘हंपी ए२`. कंपनीने आॅनलाइन बाजारपेठेत उतरवलेले पहिले उत्पादन म्हणजे देशी गाईचे दूध.  (अधिक वाचा ॲग्रोवन दिवाळी अंकात) याशिवाय.... संकल्पनात्मक लेख

  •  टोळीराज्य आणि बळी : अतुल देऊळगावकर 
  •  शेतीचं ‘इंटेलिजंट’ भविष्य : सम्राट फडणीस
  •  प्रयोगशाळेत बनताहेत मांस, दूध अन् अंडी : सतीश कुलकर्णी
  •  जीएम तंत्रज्ञानाचे अडखळलेले पाऊल : डॉ. सी. डी. मायी
  •  मॉन्सूनचे भवितव्य : डॉ. रंजन केळकर
  •  कॉर्पोरेट फार्मिंग आणि रोबोट युगाची नांदी : मनोज कापडे  
  • अनुभव 

  • कोरडवाहू दुष्टचक्र आणि माझे म्हशीपालनाचे प्रयोग : महारुद्र मंगनाळे
  • धांडोळा

  • भविष्याच्या पोटात शेतकऱ्यांसाठी अमाप संधी : राजेंद्र जाधव   
  • भविष्यातली शेती असावी पर्यावरण अनुकूल : डॉ. नीलेश हेडा   
  • ग्रामीण भारतासाठी अलीबाबाची गुहा : उदय अ. देशमुख   
  • पर्माकल्चर...एक आनंदी प्रयोग : डॉ. मयूरा बिजले  
  • मुलाखती 

  • कॉर्पोरेट फार्मिंग नव्हे; समूह शेती हेच भविष्य : विलास शिंदे  
  • इनोव्हेशन हीच भविष्याची गुरुकिल्ली :  प्रा. अनिल गुप्ता  
  • ललित 

  • कथा 
  • नवस : द. ता. भोसले   
  • लाल सावट : सुभाष किन्होळकर  
  • ललित लेख 

  • व्हिलेज डायरी : आकाश चटके   
  • आठवणीतली दिवाळी - कल्पना दुधाळ  
  • तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू? : भाऊसाहेब चासकर  
  • माझ्या सिनेमाची गोष्ट : राजकुमार तांगडे
  • कविता

  • व्यंग्यचित्रे
  • राशिभविष्य
  • ​(अंक सर्वत्र उपलब्ध, विक्रेत्याकडे संपर्क साधावा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT