कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज 
मुख्य बातम्या

कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या व्याप्तीचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात उद्यापासून (शुक्रवारी, ता. २१) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला अाहे.

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यांत पाऊस पडला, तर सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर दुपारी राज्यात ढग गोळा होऊन पुणे, परभणी, अकोला जिल्ह्यांत पावसाला सुरवात झाली होती. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, आज (ता.२०) त्याचे कमी तीव्रतेचे वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर होण्याची शक्यता आहे.

ही तीव्र प्रणाली शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम अाणि पुरीच्या परिसरावर जमिनीवर येण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत ताशी ५५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, पश्‍चिम बंगाल या राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्राेत - कृषी विभाग) : कोकण : न्याहडी ६३, उरण ३३, कापरोली ४०, जसइ ४२. मध्य महाराष्ट्र : कळवण २०, नाशिक ५३, शिंदे ३७, मडसांगवी २०, मखमलाबाद २५,  धारगाव २५, ओझर ४२, नांदूर २३, त्र्यंबकेश्‍वर ३०, प्रतापपूर २९, पारनेर ३८, श्रीगोंदा २८, कोळेगाव ३६, जामखेड ३४, अकोले ५३, समशेरपूर ३७, बेल्हा २९, घोडेगाव २०, मंचर २२, तळेगाव ढमढेरे २७, बारामती २४, पणदरे ७९, वडगाव ५५, लोणी २७, मोरगाव २९, उंडवडी २५, अंथुर्णी ४०, सणसर ३७, दौंड २०, जेजुरी ३३, सुर्डी २१, नातेपुते २२, वडूथ २६, राजाळे २८. मराठवाडा : टाकळसिंग ३१, बेंबळी २५, कंधार २७, शेवडी २५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT