खानदेशातील ग्रामपंचायतींसमोर पाणीकपातीचे संकट
खानदेशातील ग्रामपंचायतींसमोर पाणीकपातीचे संकट 
मुख्य बातम्या

खानदेशातील ग्रामपंचायतींसमोर पाणीकपातीचे संकट

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. यंदा नदी, नाल्यांना पूर न आल्याने ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठ्यासंबंधीचे स्रोत आटू लागले आहेत. यामुळे अनेक मोठ्या ग्रामपंचायतींना पाणी कपात करावी लागेल, अशी स्थिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या जिल्ह्यातील शहादा पूर्व व नंदुरबार तालुक्‍यात टंचाई स्थिती आहे. नाशिंदा, तिसी, रनाळे, खोंडामळी, कोळदे, लहान शहादे, बामखेडा भागात समस्या बिकट आहे. कोळदा येथे आदिवासी बांधवांना गावानजीकच्या विहिरीतून पाणी काढून आणावे लागत आहे. शहादा तालुक्‍यातील जयनगर, बामखेडा भागात पाऊस कमी होता. या परिसरात पुढे पाणीटंचाई वाढू शकते.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यातील अजंदे, विखरण भागासह धुळे तालुक्‍यातील जापी भागातही पाण्यासंबंधीची अडचण आहे. लामकानी, कापडणे आदी मोठ्या ग्रामपंचायतींवर पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्याचा ताण वाढू लागला आहे. साक्री तालुक्‍यातही काही भागात पाणीटंचाई जाणवू लागल्याची माहिती मिळाली. तापी काठावरील गावांमध्ये स्थिती चांगली दिसत असली तरी पर्वतानजीकच्या भागात टंचाई स्थिती वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, जामनेरात टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. अमळनेरात सुमारे १२ गावांमध्ये पाणीटंचाई अधिक आहे. मंगरूळ व इतर मोठ्या ग्रामपंचायतींसमोर पाणीपुरवठ्यासंबंधीचे संकट आहे. काही ग्रामपंचायतींनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. गिरणा काठावरील गावांमध्येही पाणीकपात लागू झाली आहे. जळगाव तालुक्‍यातील कानळदा, आसोदा, नशिराबाद आदी मोठ्या ग्रामपंचायतींना पाणीकपात लागू करावी लागेल, असे सांगितले जात आहे.

आसोदा येथे तापी नदीवरून पाणीपुरवठासंबंधीची जलवाहिनी टाकली आहे. परंतु लोकसंख्या अधिक असल्याने नियमित किंवा रोजचा पाणीपुरवठा करता येणार नसल्याची स्थिती आहे. बोदवड तालुक्‍यातही काही गावांमध्ये पाणीटंचाईबाबतच्या तक्रारी आहेत. पारोळा, चाळीसगावचा उत्तर भाग आवर्षण प्रवण आहे. या भागात पुढील १० ते १५ दिवसात पाणीटंचाई वाढण्याचे संकेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT