रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास दिवसे
रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास दिवसे 
मुख्य बातम्या

रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास दिवसे

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टरवर जाणार असून, हा पेरा विक्रमी होण्याची चिन्हे आहेत. हरभरा क्षेत्रात २० टक्के वाढण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली. “राज्यातील शेतकरी ५६ ते ५७ लाख हेक्टरच्या आसपास रब्बीचा पेरा करतात. त्यातही १२ लाखाच्या आसपास ज्वारीचा पेरा असतो. यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी होणार आहे. शेतकरी ज्वारीच्या १५ ते २० टक्के क्षेत्राला हरभऱ्याकडे वळवतील, असा आमचा अंदाज आहे. राज्यात सरासरी १४ लाख हेक्टरवर रब्बी हरभरा घेतला जातो, अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली. शेतकऱ्यांनी २०१७-१८ च्या रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरा वाढवून २० लाख हेक्टरवर नेला होता. मात्र, गेल्या हंगामात पेरा घसरून १३ लाखांवर आला.  यंदा पुन्हा पेरा वाढण्याची शक्यता आहे. खरिपात पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरी आता रब्बीच्या नियोजनावर आम्ही भर देत आहोत. आतापर्यंत साडेपाच लाखाच्या पुढे रब्बी पेरा गेला आहे. अंदाजानुसार रब्बीचा पेरा विक्रमी राहील. कारण राज्याचे रब्बीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर असले तरी २०१७-१८ मध्ये शेतकऱ्यांनी ६७ लाखांवर रब्बी पेरा नेला होता. २०१८-१९ मध्ये पेरा ३४ लाख हेक्टरवर आला. मात्र, यंदा पेरा ७० लाख हेक्टरच्या घरात जाईल, असे आयुक्त श्री. दिवसे यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले. रब्बीची धामधुम जोरात असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांची अजिबात कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. “हरभरा बियाण्यांची किंचित टंचाई जाणवू शकते. त्यासाठी आम्ही जादा ५० हजार क्विंटल प्रमाणित बियाण्यांची व्यवस्था करतो आहोत. याशिवाय बाजारपेठेतून ३० हजार क्विंटल उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडूनदेखील हरभरा बियाणे मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे आयुक्त म्हणाले. रासायनिक खतांची टंचाई नाही राज्यात यंदाच्या रब्बीत खताची अजिबात टंचाई जाणवणार नाही, असा दावा कृषी आयुक्तालयाने केला आहे. “खताची समस्या यंदा येणार नाही. कारण, गेल्या हंगामात २३ लाख टनाचा वापर शेतकऱ्यांनी केला होता. यंदा ३५ लाख टनाची मागणी आहे. मात्र, ३० लाख टन रासायनिक खते आपल्या ताब्यात आहेत. त्यामुळे आमचा भर बियाणे नियोजनावर आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT