भडगाव, पाचोरा, जळगावात वादळाने नुकसान
भडगाव, पाचोरा, जळगावात वादळाने नुकसान 
मुख्य बातम्या

भडगाव, पाचोरा, जळगावात वादळाने नुकसान

टीम अॅग्रोवन

जळगाव ः भडगाव, जळगाव, पाचोरा भागांतील अनेक गावांमध्ये मंगळवारी (ता. ११) सायंकाळी वादळासह हलका पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये घरांचे व शिवारात केळी, लिंबू बागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. १२) सकाळीच पंचनाम्यांची कार्यवाही सुरू झाली.  वादळात अनेक गावांमध्ये घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. तर भडगाव तालुक्‍यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बात्सर, लोणपिराचे, खेडगाव या भागात केळी, लिंबू बागांचे नुकसान झाले. बात्सर येथे गिरणा नदीकाठच्या केळी बागांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे ३० ते ४० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्‍यातील दापोरा, धानोरा, मोहाडी भागांतील नवती केळी बागांमध्ये केळीची झाडे जमीनदोस्त झाली.  या नुकसानीची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी लागलीच दूरध्वनीवरून संपर्क साधला व पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात पाचोरा विभागाचे प्रांत राजेंद्र कचरे यांना सूचना देऊन पंचनामे तातडीने करून त्याची माहिती बुधवारी सायंकाळपर्यंत मागितली आहे. अहवाल आल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT