शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली 
मुख्य बातम्या

‘एचटीबीटी’प्रकरणी शेतकरी संघटनेचे नितीन गडकरींना साकडे

टीम अॅग्रोवन

अकोला  : देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे व एचटीबीटी कपाशी वाणाच्या चाचण्या, प्रयोग सुरू करण्याच्या मागणीसाठी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने जिल्ह्यातून आंदोलन सुरू केले. ठिकठिकाणी आंदोलने झाली असून, याची दखल केंद्राने घ्यावी व याला मंजुरी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा केली. 

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश शर्मा, अमरावतीचे माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ पुसदेकर, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर व विजय नेव्हल उपस्थित होते.

जिल्ह्यात १० जूनला तंत्रज्ञान स्वातंत्र्य मागणीसाठी पहिले आंदोलन अकोली जहॉंगीर या गावात झाले होते. त्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने झाली. या आंदोलनाचे हरियानामध्ये देखील पडसाद उमटले. ५ जुलैला हरियानामध्ये हे आंदोलन होण्याची चिन्हे आहेत. देशभर पसरत असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अनिल घनवट यांचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले. या भेटीत सकारात्मक चर्चा होऊन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दिल्ली येथे चर्चा घडवून आणता येईल, असे आश्वासन श्री. गडकरी यांनी दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT