खानदेशात अनेक भागांत पावसाची विश्रांती
खानदेशात अनेक भागांत पावसाची विश्रांती 
मुख्य बातम्या

खानदेशात अनेक भागांत पावसाची विश्रांती

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. हलक्‍या व मध्यम प्रकारच्या क्षेत्रात चांगला वाफसा निर्माण झाल्याने या क्षेत्रात आंतरमशागतीची कामे वेगात सुरू आहेत.  मागील मंगळवारपासून (ता. ९) पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, जळगाव या भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. परंतु, ताग पिकाची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही. ही पेरणी पुढील आठवड्यात होऊ शकते. चोपडा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, धुळे या भागांतही पावसाने मागील दोन दिवस सवड दिली आहे. कडधान्य, तृणधान्य व कापूस आदी पिके अनेक भागांत तरारल्याने आंतरमशागत शेतकऱ्यांनी केली. लागलीच रासायनिक खते देण्याचे कामही शेतकऱ्यांनी उरकून घेतले. 

चोपडा तालुक्‍यात प्रतीक्षा चोपडा (जि. जळगाव) तालुक्‍यात जोरदार पाऊस अजूनही अनेक भागांत झालेला नाही. चोपडामधील तापीकाठ व जळगावमधील तापीकाठीदेखील जोरदार पाऊस झालेला नाही. पेरण्या या भागात झाल्या आहेत. हलक्‍या पावसामुळे पेरण्या यशस्वीदेखील झाल्या आहेत. परंतु, शेतातून पावसाचे पाणी वाहून निघालेले नाही. या तालुक्‍यातील गूळ प्रकल्पातील जलसाठाही हवा तसा वाढलेला नाही. जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने पावसाची टक्केवारीदेखील वाढलेली नाही. सरासरीच्या १९ टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात झाला आहे. अशीच स्थिती धुळे व नंदुरबारमध्येदेखील आहे. 

भाडेतत्त्वाने मशागतीसाठी मोठा खर्च अनेक अल्पभूधारक किंवा बैलजोडी नसलेल्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर बैलजोडीचलित अवजारांनी आंतरमशागत करून घ्यावी लागत आहे. ही मशागत या हंगामात महाग पडत असून, १२०० रुपये प्रतिदिन, अशी मजुरी दोन बैल, एक माणूस यांच्या करवी केल्या जाणाऱ्या मशागतीसाठी द्यावी लागत आहे. मिनी ट्रॅक्‍टरने वाफसा हवा तसा मिळत नसल्याने आंतरमशागत करणे अशक्‍य होत असल्याची स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT