भेंडी निर्यात
भेंडी निर्यात  
मुख्य बातम्या

शेतकरी गटाच्या माध्यमातून कोल्हापुरातून भेंडी निर्यात

Raj Chougule

कोल्हापूर: शेतकरी गटाच्या माध्यमातून भेंडी निर्यात करण्याचा यशस्वी प्रयोग नेज (ता. हातकणंगले) येथील अन्नदाता नैसर्गिक शेतकरी उत्पादक मंडळाने केला आहे. गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच युरोपला भेंडी निर्यात होत आहेत. भेंडीबरोबरच पुढील काही महिन्यांत मिरचीची निर्यातही सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. गेल्या सप्ताहात तीन टन भेंडीची निर्यात झालेली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेती महापूर व अतिवृष्टीने झोकाळून गेली आहे. प्रचंड नुकसानीच्या सावटाखाली असणाऱ्या शेतकऱ्यांना भेंडी निर्यातीचे प्रयत्न दिशादर्शक ठरणार आहेत. या गटाला सर्व्हीस प्रोव्हायडर म्हणून रेसिफ्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीने सहकार्य केल्याने या प्रक्रियेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे.  नेज (ता. हातकणंगले) येथे अन्नदाता गट कार्यरत आहे. या गटातील सुमारे पंधरा शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्री (विषमुक्त) भेंडीसाठी मे महिन्यांपासूनच लागवड सुरू केली. अत्यंत नाममात्र प्रमाणात रासायनिक खते वापरून जास्त जास्त प्रमाणात जैविक पद्धतीने भेंडीचे व्यवस्थापन केले. आता भेंडी काढणीस तयार झाली आहेत. रेसिफ्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या सेवेतून मुंबईच्या कंपनीमार्फत ही निर्यात सुरू होईल. येत्या काही दिवसांत चिपरी (ता. शिरोळ) येथून हिरवी मिरचीची निर्यात करण्यात येणार आहे. सातत्याने पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना भेंडी पिकाच्या निर्यातीतून चांगले उत्पादन मिळविण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी गटातील शेतकऱ्यांकडून समाधानकारक दरात भेंडीची खरेदी करत आहे. यामुळे उत्पादकांना ठोस दर मिळणे शक्‍य झाले आहे.  प्रतिक्रिया आमच्या शेतकरी कंपनीमार्फत आम्ही बियाणे व अन्य जैविक निविष्ठा उपलब्ध करून दिल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकात एकसारखेपणा आला. कंपनीच्या वतीने हिरवी मिरचीही निर्यात करणार आहोत. शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा याची दक्षता आम्ही घेत आहोत. - बाळासाहेब माळी, संचालक, रेसिफ्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

अन्नदाता मंडळाचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे. आम्ही स्थापन केलेल्या गटांनी असे प्रयोग करावेत, यासाठी नजीकच्या काळात निर्यातीबाबतची चर्चासत्रे आम्ही आयोजित करणार आहोत. कोणत्या पिकाला कोणत्या देशात वाव आहे. हे समजल्यास गटांना असे प्रयोग करणे शक्‍य होईल - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT