नेरला, भंडारा ः उपसा सिंचन योजनेची पाहणी करताना वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके.
नेरला, भंडारा ः उपसा सिंचन योजनेची पाहणी करताना वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके. 
मुख्य बातम्या

नेरला उपसा सिंचन योजनेला डॉ. फुके यांनी दिली भेट

टीम अॅग्रोवन

भंडारा ः गोसे खुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेला वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन डॉ. फुके यांनी दिले.  नेरला उपसा सिंचन योजनेचे पंपगृह वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर नेरला गावाजवळ बांधण्यात आले आहे. पंपगृहामध्ये प्रत्येकी १०१५ अश्‍वशक्‍तीचे १२ व्हर्टिकल टर्बाइन पंप बसविण्यात आले आहे. ऊर्ध्व नलिकेच्या चार रांगा २५०० मि.मी. व्यासाच्या १६ मि.मी. जाडीच्या ०.६९० किलोमीटर लांबीच्या आहेत. याद्वारे ३७ घनमीटर/से.चा विसर्ग वितरण कुंडात सोडण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेद्वारा भंडारा जिल्ह्याच्या चार तालुक्‍याच्या११६ गावांतील २१ हजार ७२७ हेक्‍टर लाभ क्षेत्राच्या माध्यमातून २८,६८० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याकरिता एकूण पाणीवापर १४३.७७ दलघमी इतका आहे, अशी माहिती योजनेचे अभियंता अमोल वैद्य यांनी दिली. नेरला उपसा सिंचन योजनेमध्ये शेत व घर गेलेल्या नागरिकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी डॉ. फुके यांची भेट घेत निवेदन सादर केले. पुनर्वसनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्‍वासन डॉ. परिणय फुके यांनी दिले. घराचा मोबदला मिळणेबाबतही या वेळी निवेदन सादर करण्यात आले. हा प्रश्‍न बैठकीत निकाली काढू असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT