महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ
महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ 
मुख्य बातम्या

इंधन पिकांच्या शेतीला प्राधान्य द्यावे लागणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

टीम अॅग्रोवन

राहुरी विद्यापीठ, जि. नगर  : ऊसाप्रमाणेच बांबूसारख्या पिकांपासून इथॅनोल निर्मिती शक्‍य आहे. केंद्र शासनाच्या सुसंगत धोरणामुळे वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जैव इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या पिकांची लागवड केल्यास आर्थिक स्रोत प्राप्त होईल आणि ती शेती शेतकऱ्यांस तारेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३३ व्या पदवी प्रदान समारंभात शुक्रवारी (ता. ७) श्री. गडकरी बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव होते. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषी) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, की केंद्र शासनाच्या धोरणांमुळे देशातील काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जैव इंधनावरील वाहने चालवली जात आहेत. भविष्यात जैव इंधनाच्या निर्मितीसाठी मोठी संधी आहे. बायो इथेनॉल निर्मितीतून ग्रामीण भागातील शेतकरी लखोपती व्हावे हे माझे स्वप्न आहे. पीक उत्पादन खर्च कमी करून शेती फायदेशीर कशी करता येईल याचे आव्हान आपल्यापुढे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पीक विविधतेवर संशोधन गरजेचे आहे.

राज्यपाल राव यांच्या हस्ते २०१७-१८ मध्ये बी.एस्स.सी. (कृषी) पदवीत प्रथम आलेली रुपाली प्रभाकर शिनगारे, बी.एस्स.सी. (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली श्रुती संदीप सावंत, कृषी अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली शिवानी सर्जेराव देसाई यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.  या वेळी राज्यपाल राव यांच्या हस्ते एकूण ४४११ विदयार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.  

गडकरी यांना आली भोवळ पदवी प्रदान समारंभाप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांना अचानक भोवळ आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी श्री. गडकरी यांना तातडीने सावरले. त्यांच्यावर तेथील वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार करून शिर्डीला हलवले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT