अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे विक्रीस बंदी 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यात ५२ लाखांच्या बियाणे विक्रीस बंदी

टीम अॅग्रोवन

अमरावती ः खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत ५२ लाख रुपयांचे बियाणे सदोष आढळले होते. या बियाण्यांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे.  खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टळावी, याकरिता जिल्हाभरात भरारी पथकाच्या माध्यमातून कृषी सेवा केंद्र, कंपन्यांचे निविष्ठा साठवणुकीचे ठिकाणी तपासणी करण्यात आली. यामध्ये ३२४ बियाण्यांचे, ९५ खतांचे व २६ कीटकनाशकांचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये सदोष आढळलेल्या ५.४८ लाखांच्या ६३.५ मेट्रिक टन रासायनिक खताला व ५७ हजार रुपयांच्या कीटकनाशकाच्या साठ्याला विक्रीबंद आदेश बजावण्यात आले आहेत. वरुड येथे बनावट रासायनिक खताच्या १०८ बॅग जप्त करून पोलिस तक्रार नोंदविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ही माहिती दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हंगामापूर्वीच बनावट निविष्ठांविरोधात कारवाई करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हा स्तरावरील एक व तालुका स्तरावरील १४ याप्रमाणे १५ भरारी पथकांचा वॉच आहे.  बनावट बियाण्यांपासून सावध राहा एचटी, बीटीची अवैध विक्री काही ठिकाणी होत आहे. अशा बियाण्यांचे बिल दिले जात नाही. त्यामुळे हे बियाणे उगवले नाही किंवा अन्य समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आणि शिफारशीत बियाण्यांचीच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Demands: राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करा : ठाकरे

Mumbai March Suspended: जरांगे यांचे उपोषण मागे

Monsoon Rainfall Deficit : यंदाचा मॉन्सून २००९ नंतरचा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता; पावसाची तूट १५ टक्क्यांवर

Agarwood Farming: अगरवूड लागवड : सुवर्णसंधी की सुवर्णमृग?

SCROLL FOR NEXT