मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी वऱ्हाडात आंदोलने सुरूच

टीम अॅग्रोवन

अकोला  ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले. वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने अांदोलनांचा जोर अधिक होता.

अकोला जिल्ह्यात बाळापूर  तालुक्यातील बाभूळगाव येथे आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अांदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत अारक्षणाची मागणी लावून धरली तसेच शासनाचा निषेध केला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरूळपीर या तालुक्यांत बंद पाळण्यात अाला. शेलुबाजार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शेलूबाजार येथे सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत आंदोलनास पाठिंबा दिला.

मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे सकाळी शेकडोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. याठिकाणी अांदोलकांनी  टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होती. मोप येथे अांदोलकांनी निवेदन देत अामदारांच्या राजीनाम्याची मागणी केली.  

अांदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यांच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन शिरपूर जैन येथे अांदोलकांनी पोलिसांना दिले. मराठा-कुणबी समाज हा शेती करणारा असून अाज अनेकांना कुटुंबांचे उदरभरण करणेही अडचणीचे झालेले अाहे.  शासनाच्या व्यापार धार्जिण्या धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत अाला अाहे. अशा समाजाला अाता अारक्षणाची नितांत गरज अाहे. शासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देत मागणी पूर्ण करावी, असेही निवेदनात म्हटले अाहे.         

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या   वतीने मालेगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. सकाळी नऊ वाजता सकल मराठा समाजाच्या तरुणांनी शहरातून रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठानेे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

Loksabha Election : कसबा पॅटर्नची संधी साधणार की हुकणार

Water Scarcity : पुणे विभागात पाण्यासाठी वणवण

Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

SCROLL FOR NEXT