Pune News : मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, आणि सोलापूर या जिल्ह्यांत पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे.
त्यामुळे पुणे विभागात मे च्या पहिल्याच आठवड्यात तब्बल ५७१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काळात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुद्धा झाला आहे. जुलै अखेरीस तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये खंड पडला असून सप्टेंबरच्या अखेरीस काही प्रमाणात पाऊस पडला होता.
त्यामुळे पाणी पातळी वाढली नसल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विभागात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. साधारणपणे सातारा जिल्ह्यांत १८३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात १६९ तर सोलापूर जिल्ह्यात १२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
गेल्या वर्षी याच काळात पुणे विभागात ३ गावे आणि एका वाडीवस्तीवर ४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यात सातारा जिल्ह्याचा समावेश होता. हे सर्व टँकर सातारा जिल्ह्यात सुरू होते. उर्वरित पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत टँकर सुरू झालेले नव्हते.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. परंतु पावसाळ्यात ही संख्या काही प्रमाणात कमी झाली होती. आँगस्ट आणि सप्टेबरमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने टँकरच्या संख्येत वाढ होत आहे.
विभागातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात ऐन पावसाळ्यात टॅकर सुरू ठेवण्याची वेळ सरकारवर आली होती. या तालुक्यात जानेवारीपासून टँकरची संख्या आणखी वाढली आहे. परंतु जूनमध्ये वेळेवर पाऊस न पडल्यास पाण्याचे आणखी भीषण संकट उभे राहण्याची शक्यता आहे. सध्या पुणे विभागात ५०७ गावे व २७६० वाड्यावस्त्यांवर ५७१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी २४ टँकर, तर खासगी ५४७ टँकरचा समावेश आहे.
पुणे विभागातील टँकरची स्थिती
जिल्हा गावे वाड्यावस्त्या टँकर संख्या
पुणे १३६ ८०४ १६९
सातारा १८३ ६०३ १८३
सांगली ८० ६०६ ९५
सोलापूर १०८ ७४७ १२४
एकूण ५०७ २७६० ५७१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.