‘Gram’ of certified Seed Distribution Week '‘by Agriculture’ 
मुख्य बातम्या

‘कृषी’चा ‘हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह’

नाशिक : ‘‘राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण अनुदान तत्त्वावर होईल’’, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे प्रमाणित बियाणे वितरण अनुदान तत्त्वावर होईल’’, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली. 

कृषी विभाग नियोजन सप्ताहाचे नियोजन करीत आहे. नाशिक येथे शनिवारी (ता.१६) रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या हस्ते शेतकऱ्यांना अनुदानित हरभरा व ज्वारी बियाणे वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात राज्यासाठी हरभरा पिकाचे १० वर्षांतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हिजी २०२ व बीडीएनजीके ७९८ या वाणांचे एकूण ८९ हजार ६०६ क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम २,५०० रुपये प्रतिक्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन आहे. प्रात्यक्षिकेअंतर्गत २२ हजार ३३९ क्विंटल हरभरा बियाणे मोफत वितरित करण्यात येईल. त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी ७ ते ८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. 

बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ मिळेल. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत १० वर्षांवरील ‘जॉकी-९२१८’ या वाणाचे एकूण ८५ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर मिळेल. 

‘महाडीबीटी‘वरील अर्जदारांना प्राधान्य

सप्ताहात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे वितरण होईल. ग्राम कृषिविकास समिती व बियाणे पुरवठादार संस्थांच्या समन्वयाने हरभरा प्रमाणित बियाणे वितरण होईल. या मोहिमेअंतर्गत हरभरा बियाण्यास बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करून बिजप्रक्रियेचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जदारांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cotton Procurement: कापूस खरेदीत महाराष्ट्र पिछाडीवर

Maharashtra Cold Wave: पावसाला पोषक हवामान, हुडहुडी कमी होणार

Krushi Samruddhi Yojana: अहिल्यानगरला कृषी समृद्धी योजनेसाठी सव्वा बावीस कोटी

Rabi Season: शेतकऱ्यांना रब्बीचा आधार

Foodgrain Production: भारतानं धान्य उत्पादनात नवा इतिहास रचला, भात उत्पादन सर्वाधिक, विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT