‘FRP’ 392 crore stagnant
‘FRP’ 392 crore stagnant 
मुख्य बातम्या

नाशिक विभागात ‘एफआरपी’चे तब्बल ३९२ कोटी रखडले

टीम अॅग्रोवन

नगर ः ऊसतोडीनंतर संबंधित शेतकऱ्यांना उसाचा किमान किफायतशीर दर (एफआरपी) रक्कम चौदा दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, त्याचे पालन होत नाही. नगर व नाशिक जिल्‍ह्यात आतापर्यंत एफआरपीचे ३९२ कोटी रुपये रखडले आहेत, अशी माहिती येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

कार्यालयाच्या अहवालानुसार, नगर जिल्ह्यात केवळ पाच साखर कारखान्यांनीच पूर्ण एफआरपी दिली. दोन साखर कारखान्यांकडून किती पैसे येणे आहे, याची माहिती उपलब्ध नाही. नगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात ४ अशा २६ साखर कारखान्यांतर्फे आतापर्यंत १ कोटी ३५ लाख टन उसाचे गाळप झाले. १ कोटी ३० लाख २२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन  झाले. 

१५ फेब्रुवारीपर्यंत झालेल्या १ कोटी ७ लाख ४६ हजार मेट्रिक टन उसाचे त्या-त्या कारखान्यांनी ठरवलेल्या एफआरपी रकमेनुसार २ हजार ४१२ कोटी ८३ लाख रुपये देणे आहे. त्यातील २ हजार २४ कोटी ८२ लाख रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. कोपरगाव, ज्ञानेश्वर, मुळा, संगमनेर व प्रसाद शुगरने पूर्ण रक्कम दिली आहे. संजीवनी व नाशिकमधील द्वारकाधिशच्या  एफआरपीबाबत अहवालात माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. 

निव्वळ देय जाहीर एफआरपी (प्रतिटन) 

अगस्ती ः २४५५, अशोक ः २१८८, ज्ञानेश्वर ः २०७४, कुकडी ः २४९५, प्रसाद शुगर ः २०९५, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरा) ः २२१९, गणेश ः २२२९, नागवडे (श्रीगोंदा) ः २६६१, कोपरगाव ः २३५५, मुळा ः २०७५, संगमनेर ः २२४५, संजीवनी ः २०४५, वृद्धेश्वर ः १९९९, केदारेश्वर ः २०५७, अंबालिका ः २५१३, साईकृपा (१) ः २३०५, पियुष शुगर ः २१९८, जयश्रीराम ः २२००,  गंगामाई ः २०३७, क्रांती शुगर ः २२७७, युटेक शुगर ः १८९८, कादवा ः २६९७, वसंतदादा ः २४४५, द्वारकाधीश ः २४९१, एस.जे. शुगर ः२५३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

Lake Conservation : जैवविविधतेच्या बळावर ‘त्या’ करतात तलावाचे संवर्धन

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

SCROLL FOR NEXT