Climate Change : कोकणातील रानमेवा हंगामदेखील लांबणीवर

Crops In Konkan : कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून, करवंद, जांभूळ, चारोळी, रायवळ आंबा, यांसह विविध रानमेवा हंगाम या वर्षी लांबला आहे.
Ranmeva
Ranmeva Agrowon

Sindhudurg News : कोकणातील रानमेव्याला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असून, करवंद, जांभूळ, चारोळी, रायवळ आंबा, यांसह विविध रानमेवा हंगाम या वर्षी लांबला आहे. त्यामुळे रानमेव्यावर अवंलबून असलेले आर्थिक गणिते देखील कोलमडणार आहेत.

आंबा, काजू, कोकम, सुपारी, नारळ ही कोकणातील प्रमुख फळपिके असली तरी याशिवाय कोकणातील जंगलांमध्ये विविध नैसर्गिक फळझाडे आहेत. यामध्ये रायवळ आंबा, करवंद, जांभूळ, चारोळी यांसह अनेक झाडी जंगलामध्ये आहेत. कोकणातील हा रानमेवा साधारणपणे मार्च अखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.

Ranmeva
Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

कोकणातील सर्व डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात करवंद आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करवंद हंगाम सुरू होतो. करवंदाला मोठी मागणी असते. अनेक महिला करवंदांची काढणी करून ती किलो किंवा टोपलीच्या आकारानुसार विक्री करतात. एप्रिल, मे दोन महिने साधारणपणे हा हंगाम चालतो.

या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु आता मे महिना उजाडला तरी अजूनही करवंद हंगाम सुरू झालेला नाही. अजूनही दहा ते पंधरा दिवस हा हंगाम सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या वर्षी हा हंगामच वाया जाण्याची शक्यता आहे.

Ranmeva
Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

करवंदाप्रमाणे चारोळी हंगामापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. रायवळ आंबा हंगाम देखील लांबणार आहे. जांभूळ हंगामाची देखील तीच गत आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम मानला जात असून कोकणातील सर्वच फळपिके संकटात सापडली आहेत.

करवंद, चारोळी आणि रायवळ आंबा या पिकांचे उत्पादन तर शेतकऱ्यांना कोणताही खर्च करता मिळते. परंतु हे उत्पादन मिळणे कठीण होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे रानमेव्यावर अवलंबून असलेली हजारो कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com