Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Hirda Crop : हिरड्याच्या उत्पन्नावर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने सध्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावातून हिरडा गोळा करण्याची लगबग सुरू आहे.
Hirda Crop
Hirda CropAgrowon
Published on
Updated on

Pune News : हिरड्याच्या उत्पन्नावर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने सध्या जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावातून हिरडा गोळा करण्याची लगबग सुरू आहे.

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील हातविज, आंबे, पिंपरवाडी, सुकाळवेढे, हिवरे तर्फे मिन्हेर, फांगुळगव्हण, अंजनावळे, घाटघर, देवळे, चिंचेचीवाडी, निमगिरी, अंबोली, पूर, शिरोली तर्फे कुकडन्हेर, भिवाडे खुर्द, भिवाडे बुद्रुक, घंगाळदरे, सोनावळे, चावंड, खडकुंबे, जळवंडी, खैरे, खटकाळे, खिरेश्वर, कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे, इंगळूण व परिसरात मोठ्या प्रमाणात हिरड्याचे उत्पादन घेतले जाते.

आदिवासी भागात रोजगाराच्या कोणत्याही संधी नसल्याने वर्षातून एकदा येणारा हिरडा गोळा करून त्यावर आपली उपजीविका भागविली जाते. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील परिसरात साधारण मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिरडा गोळा करण्यासाठी सुरवात केली जाते.

Hirda Crop
Hirda Production : हिरडा उत्पादकांना मदत मिळणार

हिरडा मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सकाळी लवकर उठून, पाण्याची बाटली आणि काठी घेऊन डोंगर शेतात चढाई करावी लागते. हिरड्याच्या झाडाखाली पालापाचोळा गोळा करून, मग झाडावर चढावं लागतं. कंबरेला ओटी बांधून, त्यात हिरडा गोळा करायचा.

लहान लहान फांद्यांवर जाऊन हिरडा टिपायचा. अनेकदा फांदी तुटण्याचा धोका असतो, फांदी तुटल्यावर आपण खाली पडण्याचा धोका माहीत असतानाही आदिवासी बांधव हिरडा काढत असतात. कुटुंबाच्या अर्थाजनासाठी हे धोकादायक कष्टाचे काम करत असतात. हिरडा केवळ पैसे मिळवून देणारे झाड नाही तर कष्ट आणि संघर्षाचे प्रतीक आहे. हिरडा मिळवणाऱ्या लोकांची मेहनत, धैर्य आणि संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Hirda Crop
Hirda Guaranteed Rate : हमीदरापेक्षा जास्त दराने हिरडा खरेदी होणार

हिरड्याचा उत्पादनात घट

यावर्षी तापमान अधिक असल्याने तीव्र उष्णतेमुळे हिरड्याच्या बार जळाला आहे. त्यामुळे हिरड्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. सर्व साधारण शेतकऱ्याच्या शेतात ५० हुन अधिक झाडे असतात तसेच जवळच्या वनक्षेत्रात देखील हिरड्याची झाडे असतात.

एक शेतकरी दिवसभरात ३० ते ५० किलो ओला हिरडा गोळा करतो. गोळा केलेला हिरडा घरासमोरील अंगणात वाळविला जातो. ओला हिरडा वाळविण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. हिरड्याला २०० रुपये हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

"यावर्षी हिरडाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. वर्षातून एकदा मिळणाऱ्या हिरड्याच्या उत्पन्नावर आदिवासी भागातील शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. हिरड्याला योग्य हमी भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. हिरडा नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली नाही.
- महादू निर्मळ, सरपंच हातविज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com