Education Fund : रानमसलेच्या प्राथमिक शाळेसाठी ‘लक्ष्मी’कडून सव्वा कोटींचा निधी

ZP School : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी लक्ष्मी हायड्रोलीक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सीएसआर फंडातून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.
 ZP School
ZP SchoolAgrowon

Solapur News : रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी लक्ष्मी हायड्रोलीक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सीएसआर फंडातून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीतून शाळेच्या पाच खोल्या बांधण्यात आल्या आहेत. नुकतेच शाळेच्या या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते आणि डॉ. एन. के. ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. लक्ष्मी हायड्रोलिक व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे, सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, ग्रामशिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य प्रल्हाद काशीद, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गरड, समाधान शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जगन्नाथ गरड, राजाराम गरड, बालाजी गरड, राजाभाऊ गरड, मुख्याध्यापक परमेश्वर जमादार व शिक्षक वृंद उपस्थित होते.

श्रीमती आव्हाळे म्हणाल्या, की जिल्हा परिषद शाळेसाठी इमारत बांधून कंपनीने सामाजिक बांधिलकी खूप उंचीवर नेऊन ठेवली आहे. एलएचपी कंपनीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आता गुणवत्ता वाढ करून जबाबदार शिक्षक, पालक ग्रामस्थांनी इतर उपक्रमातही सहभाग घेऊन गाव आदर्श करावे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

 ZP School
Right to Education : गरिबांच्या शिक्षण हक्कावर गदा

कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. के. ठाकरे म्हणाले, की जो शेतकरी देशासाठी संपत्ती निर्माण करतो, तोच आज हालाखीत जगतो आहे. शेतकऱ्यांचा देशामध्ये कोणी वाली नाही. खेडी अजूनही बदलत नाहीत. खरा बदल शिक्षणामुळेच घडू शकतो, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा महत्त्वाच्या आहेत. माझ्या लहान बंधूंनी जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी इमारत बांधून दिली याचा मला अभिमान वाटतो, असे सांगितले. शिवाजी धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

 ZP School
Right To Education : शिक्षण हक्क कायद्याच्या नियमांत बदल का केला?

आता शिक्षकांनी योगदान द्यावे

गेली पंधरा वर्षे मी या कंपनीसाठी अहोरात्र दिले आहेत, यात माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ आहे. सामाजिक कार्यात आमचा पुढाकार असतो. विद्यार्थ्यांच्या शाळेची अडचण लक्षात घेऊन एक कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्चून ही दिमागदार वास्तू उभारण्यात आली आहे. यापुढे शिक्षकांनी बाहेर शाळेत प्रवेश करताना बाहेरचे जग विसरून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदान करावे, असे आवाहन या वेळी लक्ष्मी हायड्रोलिकचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांनी केले.

रानमसले, ता. उत्तर सोलापूर ः येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सीएसआर फंडातून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीतून बांधण्यात आलेल्या शाळेच्या पाच खोल्यांच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, शरद ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, एन. के. ठाकरे आदी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com