‘Farmers-Scientist Dialogue’ concludes Agriculture Revitalization Week in Beed
‘Farmers-Scientist Dialogue’ concludes Agriculture Revitalization Week in Beed 
मुख्य बातम्या

बीडमध्ये ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ने कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता

टीम अॅग्रोवन

अंबाजोगाई, जि. बीड : दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र बीड-१, अंबाजोगाई यांच्या माध्यमातून १ ते ७ जुलैदरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. त्याची सांगता ‘शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमाने औरंगपूर (ता. केज) येथे करण्यात आली.

कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई, कृषी विभाग व आत्मातर्फे जिल्हाभरात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच आशा रानमारे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सुहास पंके, कृषी सहायक वंदना डाके, ग्रामसेवक रामदास लखणे व गाव तलाठी फजल शेख उपस्थित होते. 

सुहास पंके यांनी खरीप पिकात तणनाशक वापरताना घ्यावयाची खबरदारी, मका पिकातील अमेरिकन लष्करी आळीचे व्यवस्थापन व अझोला उत्पादन, या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अनेक गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

या सप्ताहात कृषी दिन, किसान गोष्टी, प्रक्षेत्र भ्रमण, पीक चिकित्सा भेटी, शेतकरी कार्यशाळा, शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद, शेतकरी गटचर्चा, शेतकरी गट बैठका, प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव कथन, पद्धती प्रात्यक्षिक आदी कार्यक्रमांचे प्रमाणात आयोजन करण्यात आले.

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका पिकातील एकात्मिक उत्पादन तंत्रज्ञान, आंबा, पेरू, शेवगा, सीताफळ, लिंबोणी लागवड तंत्रज्ञान, भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सौरभ शर्मा, शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी, कृष्णा कर्डिले, डॉ. रवींद्र कोरके, रोहिणी भरड, प्रमोद रेणापूरकर, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, ‘आत्मा’चे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकांनी भाग घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT